नवी दिल्ली : नोएडामध्ये यंदाचा खास असा ऑटो एक्स्पो पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. खास अशासाठी की या एक्स्पोमध्ये बीएस 6 मानकाच्या जवळपास सर्वच कंपन्यांच्या कार लाँच केल्या जाणार आहेत. याचबरोबर भारतीय बाजारपेठेवर लक्ष असलेल्या चीनच्या कंपन्याही भाग घेणार आहेत. या प्रदर्शनामध्ये चीनच्या कंपन्यांनी एकूण 20 टक्के जागा आरक्षित केलेली आहे. यामुळे चीनमखील कोरोना व्हाय़रसचे संकट या ऑटो एक्स्पोवर घोंघावू लागले आहे.
भारतीय वाहन उद्योगाची संघटना सियामने आयोजकांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. चीनमध्ये हा या व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसची लागण झाल्याने आतापर्यंत 250 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक उपचार घेत आहेत. वुहानमध्ये शिकणाऱ्या, राहणाऱ्या जवळपास 350 भारतीय नागरिकांना नुकतेच एअरलिफ्ट करून भारतात आणले आहे. त्यांच्यावर एका कॅम्पमध्ये लक्ष ठेवण्यात येत आहे.
Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो असणार सर्वाधिक लक्षवेधी; तब्बल 70 कार होणार लाँचभारतात येतेय जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; 100 च्या स्पीडने पळणारबाबो...! 150 किमींचा अजस्त्र 'डोलारा'; चीनची सर्वात मोठी SUV कंपनी भारतात धडकणारVideo: नवी कोरी एमजी हेक्टर भररस्त्यात पेटली; कंपनीने कारण सांगितलेचीनची कंपनी MG Moters, KIA ला टक्कर देणार; नववर्षात भारतात एन्ट्री करणारजागतिक आरोग्य संघटनेकडूनही अद्याप अशा काही सूचना आलेल्या नाहीत. तसेच जिल्हा प्रशासनानेही याबाबत काही सांगितलेले नाही, असे सियामचे वरिष्ठ पदाधिकारी सुगातो सेन यांनी सांगितले.