शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Auto Expo 2018: होंडाची नेक्स्ट जनरेशन Amaze लवकरच भारतीय बाजारपेठेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 11:14 IST

यंदाच्या ऑटो एक्सपोमध्ये 24 नव्या गाडया लाँच होतील.

नवी दिल्ली: दिल्लीत सुरु असलेल्या Auto Expo 2018 मध्ये होंडा कार्स इंडियाने नेक्स्ट जनरेशन कार अशी ओळख असलेल्या Amaze चे अनावरण केले. ही कार यंदा भारतीय बाजारपेठेत दाखल होईल, असे यावेळी होंडाकडून सांगण्यात आले. बोल्ड एक्सटीरियर स्टाइल, प्रिमियम इंटीरियर आणि ड्रायव्हिंग परफॉर्मन्स ही Amaze कारची खास वैशिष्ट्ये आहेत. या गाडीची किंमत 5.48 ते 8.41 लाख इतकी असेल.याशिवाय, होंडाकडून Auto Expo 2018 मध्ये  5th जनरेशनच्या CR-V आणि 10th जनरेशनच्या Civic या दोन गाड्याही ग्राहकांसमोर सादर करण्यात आल्या. यापैकी CR-V ही डिझेलवर चालणारी कार आहे. तर Honda Civic ही स्पोर्टस डिझाईन डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या गाडीत वैशिष्ट्यपूर्ण एलईडी हेडलॅम्प, बोल्ड कॅरेक्टर लाइन्स, स्पोर्टी अलॉय वील्स आणि एलईडी टेललॅम्प अशा सुविधा पाहायला मिळतील. यापूर्वी Honda Civic चे मॉडेल भारतात प्रचंड लोकप्रिय ठरले होते. 2006 मध्ये ही गाडी भारतीय बाजारपेठेत पहिल्यांदा लाँच करण्यात आली. त्यानंतर 2013 पर्यंत या गाडीचे भारतीय बाजारपेठेसाठी उत्पादन सुरू होते. यंदाच्या ऑटो एक्सपोमध्ये 24 नव्या गाडया लाँच होतील. या एक्सपोमध्ये 100 कंपन्या सहभागी होणार आहेत. मागच्यावेळी 88 कंपन्या होत्या अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी दिली. विशेष म्हणजे मागच्यावर्षी एक्सपोमध्ये 11 स्टार्ट-अप कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी फक्त दोन कंपन्या सहभागी होणार आहेत. एसीएमएम, सीआयआय आणि सियाम या तिघांनी मिळून संयुक्तपणे ऑटो एक्सपो : द मोटर शो 2018 चे आयोजन केले आहे. या शो ला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मोटर व्हेइकल मॅन्युफॅक्चर्स संघटनेची मान्यता आहे. 

आठ लाखापेक्षा जास्त लोक या ऑटो एक्सपोमध्ये सहभागी होतील अशी शक्यता आहे. सर्वसामान्य 9 ते 14 जानेवारी दरम्यान सहभागी होऊ शकतात. या शो मध्ये 36 पेक्षा जास्त ऑटोमेकर्स आपल्या गाडया, एसयूव्ही, टू व्हीलर आणि कमर्शिअल वाहने प्रदर्शनासाठी मांडणार आहेत. इलेक्ट्रीक वाहने या ऑटो एक्सपोचे खास वैशिष्टय असेल. या ऑटो एक्सपोत बिझनेस हवर्समध्ये तिकीटाचे दर 750 रुपये आहेत. पब्लिक हवर्समध्ये तिकिटाची किंमत 350 रुपये आहे. बिझनेस हवर्स सकाळी 10 ते 1 पर्यंत असेल तर पब्लिक हवर दुपारी 1 ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असेल. वीकएण्डला तिकिटाची किंमत 475 रुपये आहे. 

टॅग्स :Auto Expo 2018ऑटो एक्स्पो २०१८Honda Amazeहोंडा अमेझ