Auto Expo 2018: अॅक्टिव्हा 5G सोबत होंडाकडून तरुणांना एक 'सुस्साट' भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 14:40 IST2018-02-07T14:35:33+5:302018-02-07T14:40:10+5:30
होंडा अॅक्टिव्हा आणि अॅव्हिएटर यासारख्या स्कूटर्सनी बाजारात गेल्या काही वर्षांपासून चांगलाच दबदबा निर्माण केलाय. ही लोकप्रियता लक्षात घेऊन, होंडाने ऑटो एक्स्पोमध्ये अॅक्टिव्हा 5G हे आगळे मॉडेल सादर केले आहे.

Auto Expo 2018: अॅक्टिव्हा 5G सोबत होंडाकडून तरुणांना एक 'सुस्साट' भेट
नवी दिल्लीः गेल्या काही वर्षांत अॅक्टिव्हा आणि अॅव्हिएटर या होंडा कंपनीच्या स्कूटर्सनी बाजारात चांगलाच जम बसवलाय. मजबूत, टिकाऊ आणि स्वस्तात मस्त काम करणारी स्कूटर असा अॅक्टिव्हाचा नावलौकिक आहे. आपल्या स्कूटरची ही लोकप्रियता लक्षात घेऊन, होंडा इंडियाने आज ऑटो एक्स्पोमध्ये अॅक्टिव्हा 5G हे आपले अद्ययावत मॉडेल सादर केले. त्यासोबतच, एक्सब्लेड ही १६० सीसी क्षमतेची जबरदस्त बाइक लाँच करून त्यांनी तरुणांचं लक्ष वेधून घेतलंय.
होंडा अॅक्टिव्हा 5G मध्ये एलईडी हेडलॅम्प, सामानासाठी आसनाखाली 18 लीटर इतकी जागा, कॉम्बी ब्रेक, मोबाईल चार्जिंग सॉकेट तसेच डिजिटल अॅनॉलॉग कन्सोल, पूश बटणाद्वारे आसन उघडण्याची व्यवस्था यासारख्या आकर्षक सुविधा देण्यात आल्या आहेत. तर, एक्सब्लेड ही १६२.७ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन असणारी मोटारसायकल आहे. पूर्णपणे नव्याने सादर कलेल्या या एक्स ब्लेडमध्ये रोबोचा फील दिला गेला आहे. ही मोटारसायकल बहुधा मार्चमध्येच बाजारात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे. स्पोर्टी लूकची ही मोटारसायकल असून हेडलॅम्प, टेल लॅम्प हे एलईडीमध्ये आहेत डिजिटल इनस्ट्रुमेंट क्लस्टर हे तिचे आणखी एक वैशिष्ट्य असणार आहे. मॅट व मेटॅलिक रंगामध्ये या देण्यात येण्याची अपेक्षा आहे. अतिशय आकर्षक व मस्क्युलर स्वरूपाची ही मोटारसायकल आहे.
होंडा मोटारसायकली व स्कूटर्सची ११ मॉडेल सादर करणार असून यामध्ये विद्यमान बाजारपेठेत असलेल्या सीबी शाइन, होंडा सीबी शाइन एसपी, होंडा लिवो, होंडा अॅक्टिव्हा १२५, होंडा सीबी यूनिकॉर्न १५० या मोटारसायकलींच्या काही नव्या आकर्षक सुविधा असणाऱ्या दुचाकीही असू शकतात.