शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

शक्तिशाली इंजिन, जबरदस्त फीचर्ससह Audi Q5 लाँच; सहा सेकंदात पकडणार १०० किमीचा स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 6:08 PM

Audi Q5 2021 Launched : जर्मनीची लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीनं भारतात Audi Q5 2021 फेसलिफ्ट केली लाँच. पाहा कोणते आहेत जबरदस्त फीचर्स.

जर्मनीची लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीनं भारतात Audi Q5 2021 फेसलिफ्ट लाँच केली आहे. Audi Q5 मध्ये यापूर्वी प्रमाणेच डिझाईन पॅटर्न पाहायला मिळत असलं तर शक्तीशाली इंजिन आणि नफ्या फीचर्सचाही यात समावेश करण्यात आला आहे. Audi Q5 मध्ये 2.0 लीटरचे TFSI इंजिन देण्यात आले असून ही कार प्रीमिअम प्लस आणि टेक्नॉलॉजी या दोन व्हेरिअंटमध्ये येते. याशिवाय ही कार पाच कलर ऑप्शन्समध्येही पाहायला मिळते. ही कार ब्लू, आयबिस व्हाईट, मिथॉस ब्लॅक, फॉरेस्ट सिल्व्हर आणि मॅनहॅट्टन ग्रे या रंगांमध्ये उपलब्ध आहे. नव्या फेसलिफ्ट Audi Q5 ची स्पर्धा मर्सिडिज बेन्झ जीएलसी क्लास, बीएमडब्ल्यू एक्स 3 आणि लँड रोवर डिस्कव्हरी स्पोर्ट्सशी होईल.

Audi Q5 मध्ये पहिल्याप्रमाणेच डिझाईन पॅटर्न पाहायला मिळतंय. यात अॅक्टॅगनल ग्रिल, नवं बम्पर, नवे एलईडी हेड आणि टेल लँप, १७ इंचाचे अलॉय व्हिल्स देण्यात आले आहे. ग्रिलवर क्रोम गार्निश आणि स्किड प्लेट, रुफ रेल्स आणि फॉगलँप्सवर सिल्व्हर एक्सेंटही पाहायला मिळतं. इन्फोटन्मेंटसाठी Audi Q5 2021 फेसलिफ्टमध्ये अॅडव्हान्स्ड कंट्रोल पॅनल देण्यात आलं आहे. यात डिजिटल कॉकपिट इन्स्ट्रूमेंट क्लस्टरसोबत 10 इंचाचा टचस्क्रिनही देण्यात आलाय.

किंमत आणि कनेक्टिव्हीटीकनेक्टिव्हीटीसाठी या कारमध्ये Androic Auto आणि Apple CarPlay देण्यात आलं आहे. याशिवाय योसोबत Amazon Alexa सपोर्टही देण्यात आलाय. या कारमध्ये सनरुफचीही सुविधा असेल. अन्य फीचर्सबद्दल सांगायचं झाल्यास यात ऑडी पार्क असिस्ट, सेन्सर कंट्रोल्ड बूट लीड, वायरलेस चार्जिंगसोबत ऑडी फोन बॉक्स आणि 19 स्पीकर B&O प्रीमियम 3D साउंड सिस्टम देण्यात आलंय. Audi Q5 प्रीमियम प्लसची किंमत 58,93,000 रुपये आणि टेक्नोलॉजीची किंमत 63,77,000 रुपये एक्स शोरूम इतकी आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं यात आठ एअरबॅग्सही देण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे या कारमध्ये रिअर साईड एअरबॅग्सचाही समावेश आहे.

Audi Q5 इंजिनAudi Q5 2021 मध्ये कम्फर्टसह उत्तम ड्रायव्हिंग एक्सपिरिअन्स मिळणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या कारमद्ये 2.0 लिटर टीएफएसआय पेट्रोल इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन 249hp पॉवर आणि 370Nm चा टॉर्क जनरेट करतं. या शक्तीशाली इंजिनमुळे ही कार केवळ 6.3 सेकंदात 100 किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते. या कारमध्ये क्वाट्रो ऑल व्हिल ड्राईव्ह टेक्नॉलॉडी आणि डॅपल कंट्रोलसोबत सस्पेन्शन सिस्टम देण्यात आलं आहे. या कारचा सर्वाधिक स्पीड 237Kmph इतका आहे.

टॅग्स :AudiआॅडीLand Roverलँड रोव्हरMercedes Benzमर्सिडीज बेन्झ