शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Royal Enfield च्या पॉवरफुल Classic 350 साठी व्हा तयार; जबरदस्त फीचर्ससह लाँच होणार बाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 17:18 IST

Royal Enfield Classic 350 : पाहा कधी लाँच होणार बाईक आणि कोणते मिळणार जबरदस्त फीचर्स.

ठळक मुद्देपाहा कधी लाँच होणार बाईक आणि कोणते मिळणार जबरदस्त फीचर्स.

Royal Enfield च्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. दीर्घकालावधीपासून चाहते ज्या बाईकची वाट पाहत होते, अखेर त्या बाईकच्या लाँचची घोषणा कंपनीनं केली आहे. १ सप्टेंबर रोजी कंपनी आपली Royal Enfield Classic 350 लाँच करणार आहे. कंपनीनं या बाईकच्या लाँचपूर्वी एक टीझरही जारी केला आहे. 

केवळ ११ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये बाईकची थोडीशी झलक दिसून येत आहे. ज्यामध्ये सुरुवातीला हँडलबार आणि हेडलॅम्प दाखवण्यात आले आहेत. अलीकडेच, अशी बातमी आली होती की देशातील काही डीलरशिपवर या बाईकची अनधिकृत बुकिंगही सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, कंपनी क्लासिक 350 च्या या नेक्स्ट जनरेशन मॉडेलवर काम करत आहे आणि अनेक प्रसंगी चाचणी दरम्यान ती बाईक स्पॉटही करण्यात आली आहे. 

स्पॉट करण्यात आलेल्या स्पाय फोटोंमध्ये पाहिलं तर यामध्ये क्रोम बेझलसोबत रेट्रो स्टाईलच्या सर्क्युलर हेडलँप, क्रोम प्लेटेड एक्झॉस्ट (सायलेन्सर), राऊंड शेप मिरर. टियर ड्रॉप शेपमध्ये फ्युअल टँक आणि आकर्षक फेंडर्स देण्यात आले आहेत. याच्या साईड पॅनल आणि फ्युअल टँकवरही ग्राफीक्स देण्यात आले आहेत. तसंच फेंडरमध्ये नव्या स्ट्रीप्सही दिसून आल्या आहेत.काय आहेत स्पेसिफिकेशन्स?ही बाईक कंपनीच्या नवीन "J" मॉड्युलर आर्किटेक्चरवर आधारित आहे, ज्यावर कंपनीने नुकतीच सादर केलेली मेट्योर 350 देखील तयार केली आहे. यामध्ये कंपनी 349cc क्षमतेचं नवीन फ्युएल इंजेक्टेड इंजिन दिलं आहे, ते 20.2bhp पॉवर आणि 27Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससह येते.

काय आहे विशेष?नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक सिंगल आणि ड्युअल सीट व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. नवीन सीट सेटअपमध्ये मागील सीटच्या काठावर अधिक चांगल्या कुशनसह अधिक गोलाकार फिनिश देण्यात आलं आहे, जे लांब पल्ल्यापर्यंत आरामदायक राइडचा अनुभव प्रदान करेल. नेक्स्ट जनरेशन बाईकची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडी चालवताना त्याचं कंपनी खुप कमी जाणवेल. असं सांगितलं जात की या बाईकमधील कंपन कमी करण्यासाठी बॅलेंन्सर शाफ्ट जोडण्यात आला आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी चांगला होतो. नवीन बाईक सध्याच्या मॉडेलपेक्षा किंचित महाग असू शकते.

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डIndiaभारतbikeबाईक