शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

फक्त 2 दिवस आहेत शिल्लक, 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर Ola चे टेन्शन वाढवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 17:59 IST

Ather कंपनीची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450 Apex येत्या 6 जानेवारीला ग्राहकांसाठी लाँच केली जाणार आहे.  

नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooters) मागणी झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर एथर (Ather) कंपनी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. Ather कंपनीची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450 Apex येत्या 6 जानेवारीला ग्राहकांसाठी लाँच केली जाणार आहे.  

Ather ची S सीरीजमध्ये येणारी ही नवीन स्कूटर कंपनीच्या सध्याच्या Ather 450X आणि Ather 450S या मॉडेल्सपेक्षा अधिक पॉवरफुल असणार आहे. Ather 450X मॉडेलच्या तुलनेत Ather 450 Apex मध्ये अधिक पॉवरफुल मोटर दिली जाऊ शकते. जर कंपनीने आपल्या नवीन मॉडेलमध्ये खरंच पॉवरफुल मोटर दिली तर त्याचा सर्वात मोठा फायदा स्कूटरच्या परफॉर्मेंस आणि स्पीडमध्ये दिसून येईल. 

कंपनीने निःसंशयपणे हे नवीन मॉडेल आपल्या अधिकृत साइटवर सूचीबद्ध केले आहे, परंतु आतापर्यंत या स्कूटरबद्दल काहीही माहिती उघड केली नाही. या आगामी स्कूटरबाबत आत्तापर्यंत आलेल्या रिपोर्ट्समध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, या स्कूटरचा टॉप स्पीड 100 किमी प्रतितास असेल आणि ही स्कूटर केवळ 3 सेकंदात 0 ते 40 पर्यंत वेग वाढवेल. त्यामुळे आगामी काळात ही बाईक ओला स्कूटरला टक्कर देऊ शकते.  

बॅटरी 450 एक्स मॉडेलप्रमाणे या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.7 kWh बॅटरी देखील दिली जाऊ शकते. या स्कूटरमध्ये इको, राइड, स्पोर्ट आणि Warp+ राइडिंग मोड असतील, यासंदर्भात कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खुलासा झाला आहे.

कधी सुरु होणार डिलिव्हरी?Ather Energy च्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीवरून असे समोर आले आहे की, तुम्ही 2500 रुपये बुकिंग रक्कम भरून ही स्कूटर बुक करू शकता. याशिवाय मार्च 2024 मध्ये ग्राहकांना स्कूटरची डिलिव्हरी सुरू होईल.

किती असेल किंमत?Ather 450 एक्स प्रो मॉडलची किंमत 1.67 लाख रुपये (एक्स-शोरूम, बंगलुरु) आहे. तर या प्रो मॉडलपेक्षा Ather ची आगामी इलेक्ट्रिक स्कूटर महाग असणार आहे. दरम्यान, सध्या कंपनीने अॅपेक्स मॉडेलच्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.    

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेडbikeबाईकAutomobileवाहन