शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

ट्रॅक्टरलाच जुगाड करून बनवली जीप; आनंद महिंद्रांनीही या कामगिरीला दिली दाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 16:47 IST

Anand Mahindra : महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या ट्विटर हँडलवरून (Twitter Handle) हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

मोडिफाइड वाहनांचे (Modified Vehicles) फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतात. उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही सोशल मीडियावर असाच एक फोटो शेअर केला आहे, जो सर्वाधिक चर्चेत आहे. हा फोटो एका जीपचा आहे, जी महिंद्रा ट्रॅक्टरमध्ये बदल करून तयार करण्यात आली आहे. ट्विटरवर या फोटोला अनेकांनी लाईक केले आहे.

महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या ट्विटर हँडलवरून (Twitter Handle) हा फोटो शेअर करण्यात आला आहे. तसेच, मेघालयातील जोवई (Jowai) येथे राहणार्‍या माईया रिंबाई (Maia Rymbai) यांनी ही अनोखी जीप तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. फोटो शेअर करताना महिंद्रा ट्रॅक्टर्सने लिहिले की, 'मेघालयच्या Maia Rymbai यांनी हे सिद्ध केले आहे की टफ सुद्धा कूल होते. आम्हाला 275 एनबीपीची ही मोडिफाइड पर्सनालिटी आवडली आहे.'

ही अनोखी क्रिएटिव्हिटी पाहून आनंद महिंद्रा स्वतःला रोखू शकले नाहीत. महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या ट्विटला रिट्विट करत त्यांनी लिहिले, 'हा एक विचित्र दिसणारा प्राणी आहे, परंतु तो डिस्ने अॅनिमेटेड चित्रपटातील गोंडस पात्रासारखा दिसतो.' महिंद्राच्या ट्रॅक्टरचा हा अवतारही यूजर्सना खूप आवडला आहे. एका यूजरने रिप्लायमध्ये लिहिले की, हा ग्रेट खलीचा अधिकृत ट्रक असावा.

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर मजेशीर पोस्ट करत असतात. मोडिफाइड ट्रॅक्टरशिवाय त्यांनी येझ्डीचा जुना फोटोही शेअर केला आहे. एक दशक जुना येझ्डीचा फोटो पोस्ट करत, एका युजर्सने लिहिले की, तो जुना अल्बम शोधताना सापडला. हे शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की आठवणी, भावना आणि आनंद…त्यामुळेच तो येझ्डी सारख्या प्रतिष्ठित ब्रँडला पुनरुज्जीवित करत आहे. दरम्यान, महिंद्राच्या कंपनीने अलीकडेच भारतीय बाजारात येझ्डी आणि जावा सारख्या जुन्या मोटरसायकल ब्रँड्सना नवा लुक देऊन पुन्हा लॉन्च केले आहे.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राSocial Mediaसोशल मीडियाAutomobileवाहन