शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा रस्त्यांवर दिसणार Ambassador Car, नव्या अवतारात होणार लॉन्च !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 17:16 IST

Ambassador Car : कोलकाता पासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेला उत्तरपारा कार प्लांट हा देशातील सर्वात जुना कार प्लांट आहे.

नवी दिल्ली : भारतातील सत्ता आणि राजकारणाचे प्रतीक मानली जाणारी अ‍ॅम्बेसिडर कार (Ambassador Car) लवकरच पुनरागमन करणार आहे. म्हणजेच, ही कार आता पूर्णपणे नवीन लूकमध्ये पुन्हा रस्त्यांवर दिसणार आहे. 

अ‍ॅम्बेसिडर कार निर्माता कंपनी हिंदुस्थान मोटर्सने (Hindustan Motors) युरोपियन ऑटोमोबाईल कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. या युरोपियन कंपनीचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही, परंतु असे म्हटले जाते की, हा करार  Peugeot सोबत केला गेला आहे. 

या सामंजस्य करारानुसार, दोन्ही कंपन्या पुन्हा एकदा कंपनीच्या उत्तरपारा प्लांटमध्ये कार आणि स्कूटरचे उत्पादन सुरू करतील. यावेळी अ‍ॅम्बेसिडर इलेक्ट्रिक अवतारात परत येईल, पण त्याआधी कंपनी इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवायला सुरुवात करेल. 

हिंदुस्थान मोटर्सचे संचालक उत्तम बोस म्हणाले की, नव्या 'Amby'चे डिझाईन, नवा लुक आणि इंजिन यासाठी काम सुरू आहे. ते आधीच अडव्हॉन्स स्टेडमध्ये आहे.

देशातील सर्वात जुना कार प्लांटकोलकाता पासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेला उत्तरपारा कार प्लांट हा देशातील सर्वात जुना कार प्लांट आहे. तर जपानमधील टोयोटाच्या प्लांटनंतर हे आशियातील दुसरे सर्वात जुने प्लांट आहे. हिंदुस्थान मोटर्सच्या अ‍ॅम्बेसिडर कार 1970 पर्यंत भारतातील रस्त्यांवर राज्य करत होत्या. नंतर मारुती सुझुकीसारख्या कंपन्यांची स्वस्त वाहने आल्यामुळे बाजारात अ‍ॅम्बेसिडर कारची मागणी कमी होऊ लागली. अखेर 2014 मध्ये कंपनीने त्याचे उत्पादन बंद केले.

टॅग्स :carकारAutomobileवाहनbusinessव्यवसायAutomobile Industryवाहन उद्योग