शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

नवीन वर्षात 'या' गाड्या महागणार, कंपन्यांकडून दरवाढीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 19:26 IST

सर्वसामान्यांच्या मारुती अल्टोपासून ते उच्चभ्रू लोकांच्या ऑडीपर्यंतच्या कारच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली :  नवीन वर्ष महागाईचे असणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आतापासून तुमचे बजेट थोडे वाढवा. याचे कारण म्हणजे 1 जानेवारीपासून अनेक कंपन्यांच्या कारच्या किमती वाढणार आहेत. सर्वसामान्यांच्या मारुती अल्टोपासून ते उच्चभ्रू लोकांच्या ऑडीपर्यंतच्या कारच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. बहुतेक कंपन्यांनी जागतिक आव्हानांमुळे किंमत वाढवण्याचे कारण सांगितले आहे, तर चिपचे संकट देखील कायम आहे.

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki Car Price Hike) आपल्या संपूर्ण रेंजची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. ही वाढ वेगवेगळ्या मॉडेलनुसार ठरवली जाईल. कंपनी Alto, Alto K 10, Baleno, Brezza, Celerio, Ciaz, Dzire, Eeco, Ertiga, Grand Vitara, Ignis, S-Presso, Swift, Wagon R आणि XL6 च्या किमती वाढवणार आहे.

याचबरोबर,  टाटा मोटर्सने (Tata Motors Car Price Hike) देखील जानेवारी 2023 पासून किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये Altroz, Harrier, Nexon, Nexon EV, Punch, Safari, Tiago, Tiago EV, Tigor आणि Tigor EV सारख्या कारचा समावेश असू शकतो.

Kia ची कार 50,000 रुपयांनी महागणारकिआ इंडियाने जानेवारी 2023 पासून (Kia India Car Price Hike) आपल्या कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या सर्व रेंजची किंमत 50,000 रुपयांनी वाढणार आहे. ही वाढ 31 डिसेंबर 2022  नंतर केलेल्या बुकिंगसाठी लागू होणार आहे.

Audi च्या किमती 1.7 टक्क्यांपर्यंत वाढणारलक्झरी कार निर्माता ऑडी इंडियाने (Audi Car Price Hike) 1 जानेवारीपासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती 1.7 टक्क्यांनी  वाढवण्याची घोषणा केली आहे. त्याच वेळी, मर्सिडीज बेंझ इंडियाच्या आणखी एका लक्झरी कार कंपनीने 5 टक्के दरवाढीची घोषणा केली आहे.

या कार कंपन्यांनीही केली घोषणा याशिवाय, बुधवारी रेनॉल्ट इंडियानेही (Renault Car Price Hike) आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र,  Kwid, Triber आणि Kiger सारख्या गाड्या विकणाऱ्या Renault India ने अजून कोणत्या कारची किंमत किती वाढवणार हे सांगितलेले नाही. दुसरीकडे,  एमजी मोटर इंडियाने (MG Motor Car Price Hike) ने म्हटले आहे की,  लवकरच मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार कारच्या किमती दोन-तीन टक्क्यांनी वाढवल्या जातील.

टॅग्स :carकारAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग