शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

'पुष्पा'च्या कार कलेक्शनमध्ये 'चालतं-फिरतं घर'ही, तुम्हीही म्हणाल, 'झुकेगा नहीं'! किंमत जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:58 IST

या व्हॅनिटीमध्ये आरामदायी मसाज सीटसह विश्रांतीसाठी स्पेसही देण्यात आली आहे. जेथे शूटनंतर आरामही केजा जाऊ शकतो.  हिच्या मध्ये लेदर सीट्स, जाईंट मिरर आणि मून लाइटिंगचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. ही सर्व वैशिष्ट्ये पंचतारांकित हॉटेलमधील एखाद्या रूम प्रमाणे आहेत. यात एक छोटे बाथरूमही आहे.

'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन पुन्हा एकदा चर्चेत आहे. खरे तर, या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली. त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने नुकताच 1100 कोटींहून अधिकचा व्यवसायही केला आहे. महत्वाचे म्हणजे, अल्लू कमाईसोबतच पैसा खर्च करण्यातही मागे नाही. तो प्रामुख्याने वाहनांवर बराच पैसा खर्च करतो. त्याच्याकडे अनेक आलिशान वाहनं आहेत. त्यात व्हॅनिटी व्हॅनचाही समावेश आहे. ही व्हॅनिटी एखाद्या चालत्या फिरत्या घरापेक्षा कमी नाही.

अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनचे नाव फाल्कन असे आहे. जी आपल्या आवश्यकतेनुसार कस्टमाइजही केली जाऊ शकते. हिची किंमत 7 कोटी रुपये एवढी असल्याचे सांगण्यात येते. ही व्हॅन सर्व सुविधांनी सज्ज आहे. ती एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या रूम प्रमाणे दिसते. या व्हॅनवर अभिनेत्याच्या नावाचा लोगोदेखील आहे, यावर 'AA' पाहू शकता. ही व्हॅनिटी बाहेरून पूर्णपणे काळ्या रंगाची आहे. हिच्या आत उबर-कूल इंटिरियर दिसू शकते. यात सिल्व्हर आणि व्हाइट इंटीरियर थीम आहे.

या व्हॅनिटीमध्ये आरामदायी मसाज सीटसह विश्रांतीसाठी स्पेसही देण्यात आली आहे. जेथे शूटनंतर आरामही केजा जाऊ शकतो.  हिच्या मध्ये लेदर सीट्स, जाईंट मिरर आणि मून लाइटिंगचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. ही सर्व वैशिष्ट्ये पंचतारांकित हॉटेलमधील एखाद्या रूम प्रमाणे आहेत. यात एक छोटे बाथरूमही आहे. अल्लूने स्वतः त्याच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहेत.

याशिवाय, अल्लूच्या गॅरेजमध्ये रोल्स रॉयस कुलीनन देखील आहे. हिची किंमत 6.95 कोटी रुपये एवढी असल्याचे सांगण्यात येते. या ऑल व्हील ड्राइव्ह कारमध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. त्याच्याकडे काळ्या रंगाची Hummer H2 देखील आहे. मात्र, हे कोणते मॉडेल आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही. अल्लूकडे सुमारे 99.5 लाख रुपयांची Jaguar XJL देखील आहे. आता ही कार भारतात बंद करण्यात आली आहे. यासोबतच त्याच्याकडे 1.78 कोटी रुपयांची रेंज रोव्हर व्होग आणि व्होल्वोची XC90 T8 एक्सलन्स देखील आहे. ही 4 सीटर लक्झरी एसयूव्ही आहे.

टॅग्स :Allu Arjunअल्लू अर्जुनcarकारAutomobileवाहन