ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 17:27 IST2025-09-07T17:26:49+5:302025-09-07T17:27:12+5:30
Hyundai GST Rate cut price in Car: ह्युंदाईच्या ताफ्यातील सर्व कारवर ६० हजार ते २.४० लाख रुपयांपर्यंत जीएसटी कपात होणार आहे.

ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
जीएसटी कपातीनंतर आता ऑटो कंपन्या एकामागोमाग एक अशा कारच्या किंमती कमी करू लागल्या आहेत. सर्वात प्रथम टाटाने जीएसटी कपातीचे दर जारी केले होते. आता ह्युंदाईने आपल्या कारवर किती जीएसटी कपात होणार हे जाहीर केले आहे. यानुसार २२ सप्टेंबरपासून ह्युंदाईच्या नियॉसवर ७३,८०८ रुपये कमी होणार आहेत.
ह्युंदाईच्या ताफ्यातील सर्व कारवर ६० हजार ते २.४० लाख रुपयांपर्यंत जीएसटी कपात होणार आहे. ह्युंडाई ऑरा ७८,४६५ रुपयांपर्यंत कमी होणार आहे. तर एसयूव्ही एक्स्टरवर ८९,२०९ रुपयांपर्यंत जीएसटी कमी होणार आहे.
प्रीमियम हॅचबॅक आय२० ९८,०५३ रुपयांनी स्वस्त होईल, तर एन लाईन १,०८,११६ रुपयांनी स्वस्त होणार आहे.
कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हेन्यूची किंमत १,२३,६५९ रुपयांनी कमी होणार आहे. व्हेन्यू एन लाईनची किंमत १,१९,३९० रुपयांनी कमी होईल. या जीएसटी कपातीचा क्रेटालाही फायदा होणार आहे. क्रेटावरील जीएसटी ७२,१४५ रुपयांनी कमी होईल. तर क्रेटा एन लाईनची किंमत ७१,७६२ रुपयांनी कमी होईल.
या तुलनेत ह्युंदाई व्हर्नाची किंमत जरा कमीच म्हणजे 60,640 रुपयांनी कमी होणार आहे. तर अल्काझार ही सात सीटर एसयुव्ही 75,376 रुपयांनी कमी होणार आहे. जीएसटी कपातीचा सर्वाधिक परिणाम ह्युंदाई टक्सन या एसयुव्हीवर होणार आहे. या एसयुव्हीची किंमत 2,40,303 रुपयांनी कमी होणार आहे.