एफझेडच्या यशानंतर यामहाची ही स्कूटर करणार धुमशान...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 12:57 PM2018-10-30T12:57:15+5:302018-10-30T13:00:33+5:30

भारताला भविष्यात बुलेट ट्रेन देणाऱ्या जपानची दुचाकी निर्माती कंपनी यामहाने एफझेड या धूम स्टाईल बाईकद्वारे भारतीय तरुणाईला भुरळ पाडली ...

After the success of FZ, Yamaha will launch Nmax scooter soon | एफझेडच्या यशानंतर यामहाची ही स्कूटर करणार धुमशान...

एफझेडच्या यशानंतर यामहाची ही स्कूटर करणार धुमशान...

Next

भारताला भविष्यात बुलेट ट्रेन देणाऱ्या जपानची दुचाकी निर्माती कंपनी यामहाने एफझेड या धूम स्टाईल बाईकद्वारे भारतीय तरुणाईला भुरळ पाडली आहे. मात्र, स्कूटर श्रेणीमध्ये धूम माजविण्यासाठी फसिनोचा प्रयोग फसल्यानंतर यामहाने आणखी एक धाकड स्कूटर भारतीय बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

 
यामहाच्या एफझीनंतर YZF-R15 या बाईकने जगभरात यश मिळविले. तसेच भारतातही R15 या बाईकने तरुणाईला आकर्षित केले. मात्र, स्कूटर श्रेणीमध्ये यामहाला म्हणावे तसे यश मिळवता आलेले नाही. होंडा, हीरो आणि टीव्हीएसने ही बाजारपेठ काबिज केलेली असताना यामहाने fascino ही स्कूटर आणली होती. मात्र, म्हणावा तेवढा प्रतिसाद या स्कूटरला मिळाला नाही. यामुळे यामहाने सुझुकीच्या बर्गमॅन, टीव्हीएसच्या एन टॉर्क आणि एप्रिला  SR150 ला स्पर्धा करण्यासाठी मस्क्युलार स्कूटर NMax 2019 मध्ये लाँच करणार आहे. 


ही स्कूटर 155 सीसी असणार असून हेच इंजिन YZF R15 V3.0 मध्ये वापरण्यात आले आहे. मात्र, या स्कूटरची ताकद कमी करण्यात आली आहे. लिक्विड कूल, चार व्हॉल्वचे इंजिन 14.8 पीएसची ताकद 8 हजार आरपीएमलाच निर्माण करते. तसेच 14.4 एमएम पीक टॉर्कही 6 हजार आरपीएमला निर्माण करते. यामुळे ही स्कूटर Aprilia SR150 पेक्षा सरस ठरते.


आंतरराष्ट्रीय मॉडेलमध्ये एलईडी लाईट, 13 इंचाचे अलॉय व्हील्स, डिजिटल क्लस्टर, डिस्क ब्रेक आणि विडस्क्रीन अशा सुविधा आहेत. इंडोनेशियामध्ये या स्कूटरची किंमत 1.5 लाख असून भारतात ही स्कूटर 1 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. 

Web Title: After the success of FZ, Yamaha will launch Nmax scooter soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.