कारचे सनरुफ मौजेचे, पण त्यामुळे काय काय होऊ शकते... अपघातातून वाचणे अवघड जाईल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:34 IST2023-02-07T16:34:07+5:302023-02-07T16:34:19+5:30
सनरुफ हे फिचर कारमध्ये लोकांना तसे आकर्षितच करण्यासाठी दिले जातेय. कारण ते मौजेसाठी असते. बाहेरची खुली हवा आत हवी असेल किंवा रात्रीचे तारे पहायचे असतील म्हणून सनरुफ उघडणारे फार कमीच आहेत.

कारचे सनरुफ मौजेचे, पण त्यामुळे काय काय होऊ शकते... अपघातातून वाचणे अवघड जाईल...
भारतीय बाजारात आजकाल सनरुफच्या कारची मोठी क्रेझ आहे. आता तर टाटाच्या फाईव्ह स्टार पंचलादेखील सनरुफ फिचर येतेय. या सनरुफमधून बाहेर डोकावल्यास पोलीस चलन फाडतात, हे खरे आहे. पण सापडला तर ना... म्हणून आपण लहान मुलांना देखील सनरुफ उघडून बाहेरची हवा खायला देतो. पण हेच सनरुफ काय कार करू शकते... हे माहितीय का?
सनरुफ हे फिचर कारमध्ये लोकांना तसे आकर्षितच करण्यासाठी दिले जातेय. कारण ते मौजेसाठी असते. बाहेरची खुली हवा आत हवी असेल किंवा रात्रीचे तारे पहायचे असतील म्हणून सनरुफ उघडणारे फार कमीच आहेत. एखाद्या वेळी सनरुफच्या कारचा अपघात झाला तर काय होऊ शकते?
पहिली गोष्ट म्हणजे सनरुफची कारच ही तशी कठीण असते. तुमची गाडी आदळल्यानंतर दुसऱ्या सीटवर बसलेला व्यक्ती, लहान मुल हे वरती आदळते. ते जर काचेवर आदळले तर त्याचे डोके फुटू शकते. यामुळे जगभरात मृत्यूही झालेले आहेत.
दुसरी बाब म्हणजे सनरुफ उघडा असेल आणि वळणावर तोल गेला तर कार पलटते. अशावेळी आत बसलेला व्यक्ती, किंवा सनरुफमधून बाहेर डोकावत असलेला व्यक्तीचे डोके थेट रस्त्यावर जाऊन आदळते. अशा अपघातातही मृत्यू झाले आहेत. यामुळे सनरुफ फायद्याचा की तोट्याचा याचा विचार करूनच त्याचा वापर करावा.
सनरुफचा एक फायदाही आहे...
अपघात झाला आणि जर तुम्ही कारमध्ये अडकला असाल तर सनरुफ खोलून किंवा फोडून बाहेर देखील पडू शकता.
सनरुफ किती प्रकारचे असतात....
सनरुफ हे सात प्रकारचे असतात. यामध्ये इनबिल्ट सनरूफ, पॉप-अप सनरूफ, स्पॉयलर सनरूफ, पॅनोरामिक सनरूफ, फोल्डिंग/रॅग-टॉप्स, टॉप-माउंट स्लाइडिंग रूफ, सोलर सनरूफ हे प्रकार आहेत. हे सनरुफ त्या त्या कारच्या प्रकारानुसार दिले जातात.