कार किंवा मोटारसायकलच्या टायरमध्ये योग्य हवेचा दाब राखणे खूप महत्वाचे आहे. पैशांची बचत आणि सुरक्षिततेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. वाहनांच्या टायरमध्ये हवा कमी ठेवल्यास मायलेज कमी होऊ शकते. शिवाय, अपघाताचा धोकाही टाळता येऊ शकतो. त्यामुळे वाहनांच्या टायरमधील हवेचा दाबा नियमित तपासणे आवश्यक आहे.
१) अपघाताचा धोका वाढतोवाहनांच्या टायरमध्ये हवा कमी असल्याने अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता असते. टायरमध्ये कमी हवा असल्याने रस्त्यावर टायरची पकड कमी होते. त्यामुळे ओल्या रस्त्यावर किंवा वळण घेताना वाहन घरण्याची शक्यता असते. शिवाय, अचानक ब्रेक लावल्यास वाहनाला नियंत्रित करणे कठीण होऊ शकते. टायर गरम होऊ शकतो किंवा फुटूही शक्यतो.
२) इंधन कार्यक्षमतेत घट वाहनातील कमी हवेच्या दाबाचा आणखी एक तोटा म्हणजे इंधन कार्यक्षमता कमी होते. टायरमध्ये हवा कमी असल्याने टायरचा मोठा भाग रस्त्याला स्पर्श करतो, ज्याला रोलिंग रेझिस्टन्स म्हणतात. यामुळे जास्त इंधन खर्च होते आणि कमी मायलेज मिळते.
३) वाहनांवर नियंत्रण मिळवणे कठीणवाहनांमध्ये कमी हवा ठेवल्याने शॉक अॅब्सॉर्बर्स आणि इतर सस्पेंशन भाग लवकर खराब होऊ शकतात. स्टीअरिंग जड वाटू शकते. त्यामुळे वळणावर वाहन नियंत्रिण करणे कठीण होऊ शकते.
४) राइडची गुणवत्ता खराब होतेकोणत्याही वाहनाच्या टायरमध्ये हवा कमी असल्याने राइडची गुणवत्ता खराब होते. शिवाय, वाहन चालवताना जास्त आवाज येतो आणि वाहन चालवण्याचा आनंद मिळणार नाही.