2025 TVS Sport New ES Plus: भारतातील आघाडीची टू-व्हिलर उत्पादक कंपनी TVS ने त्यांच्या लोकप्रिय स्पोर्ट बाईकचे नवीन व्हेरिएंट ES+ लॉन्च केले आहे. दिल्लीमध्ये त्याची एक्स-शोरूम किंमत फक्त (60,881) रुपये ठेवण्यात आली आहे. या नवीन बाईकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा जबरदस्त मायलेज. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाईक 65 किमी प्रति लिटरपेक्षा जास्त मायलेज देते.
टीव्हीएस स्पोर्ट ईएस+ विशेषतः अशा ग्राहकांसाठी डिझाइन केली आहे, जे कमी किमतीत जास्त मायलेज आणि स्टायलिश बाईक शोधत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे ही बाईक मध्यमवर्गीयांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. या बाईकची बाजारात हिरो स्प्लेंडरशी थेट स्पर्धा असेल.
लूक अन् डिझाईनटीव्हीएस स्पोर्ट ईएस+ ला नवीन डिझाइन अपडेट देण्यात आले आहेत. यात राखाडी-लाल आणि काळा-निऑन सारखे आकर्षक रंग पर्याय देण्यात आले आहेत. याशिवाय स्पोर्टी अलॉय व्हील्सवर पिनस्ट्रिपिंग देण्यात आले आहे. फक्त ES+ व्हेरिएंटमध्ये मिळणारा काळा पिलियन ग्रॅब रेल या बाईकला इतर मॉडेल्सपेक्षा वेगळी बनवते. रंगीत हेडलाइट काऊल आणि मडगार्ड या बाईकला प्रीमियम लूक देतात.
इंजिन अन् परफॉर्मन्सइंजिन आणि कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, TVS Sport ES+ मध्ये 109.7cc सिंगल सिलेंडर, एअर-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड इंजिन आहे. हे 8.08 bhp पॉवर आणि 7.8 Nm टॉर्क जनरेट करते. यात 4-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील मिळतो. ही बाईक जास्तीत जास्त 90 किमी प्रतितास वेग गाठू शकते. कंपनीच्या मते बाईकचे मायलेज 65 किमी प्रति लिटरपेक्षा जास्त आहे. या बाईकला 10 लिटरचा पेट्रोल टँक मिळतो.