शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

६ एअरबॅग्ज आणि ADAS सेफ्टी फीचर्स... ३१ जानेवारीनंतर Honda Amaze ची किंमत वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:30 IST

Honda Amaze : जर तुम्हालाही ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे.

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात होंडा कंपनीने ग्राहकांसाठी अमेझचे (Amaze) फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले होते. ८ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह हे मॉडेल लाँच करण्यात आले होते. मात्र, आता या मॉडेलची किंमत लवकरच वाढली जाणार आहे. कंपनीने सुरुवातीची किंमत असलेली ऑफर ३१ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. पण, आता ही ऑफर लवकरच संपणार आहे.

जर तुम्हालाही ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. होंडा अमेझची किंमत ३१ जानेवारीनंतर वाढू शकते. कारण कंपनी सुरुवातीच्या किंमतीत बदल करू शकते. या कॉम्पॅक्ट सेडानचे तीन व्हेरिएंट्स लाँच करण्यात आले असून यामध्ये ६ कलर ऑप्शन देण्यात आले आहेत.

काय आहेत फीचर्स?या कॉम्पॅक्ट सेडानमध्ये ८ इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेला सपोर्ट करते. याशिवाय, या कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ७ इंचाचा टीएफटी ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर, ६ स्पीकर ऑडिओ सिस्टम आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट देण्यात आले आहेत. तसेच, या कारमध्ये ४१६ लिटर बूट स्पेस देण्यात आली आहे. जेणेकरून तुम्ही तुमचे बरेच सामान कारच्या डिग्गीमध्ये ठेवू शकता.

या कारमध्ये लेव्हल २ एडीएएस फीचर्स जसे की, लेन कीप असिस्ट, अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, रोड डिपार्चर मीटिंग असे अनेक सेफ्टी फीचर्स आहेत. या कारमध्ये लेनवॉच कॅमेरा, ६ एअरबॅग्ज, व्हेईकल स्टॅबिलिटी असिस्ट, हिल स्टार्ट असिस्ट, रियर पार्किंग सेन्सरसह मल्टी-अँगल रिअर पार्किंग कॅमेरा, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ISOFIX सपोर्ट आणि इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, असे काही फर्स्ट इन सेगमेंट फीचर्स देण्यात आले आहेत.

इंजिन डिटेल्सहोंडा अमेझमध्ये १.२ लिटर नॅचरली एस्पिरेटेड iVtec पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे,  जे ८९ बीएचपी पॉवर आणि ११० एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच, ही कार तुम्हाला ५ स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह मिळणार आहे. याशिवाय, कंपनीच्या मते, या कारचे मॅन्युअल व्हेरिएंट प्रति लिटर १८.६५ किमी पर्यंत मायलेज देते तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट १९.४६ किमी पर्यंत मायलेज देते.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगHondaहोंडाHonda Amazeहोंडा अमेझ