शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Hero Glamour 2023 : नवी बाईक 82 हजारात लाँच, एक लिटर पेट्रोलमध्ये 63 किमी धावेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 2:12 PM

हिरो मोटोकॉर्पची ही बाईक आधीपेक्षा किती बदलली आहे? याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली :  हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) ग्राहकांसाठी भारतीय बाजारपेठेत हिरो ग्लॅमर (Hero Glamour) बाईकचे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. ही बाईक ग्राहकांना ड्रम आणि डिस्क या दोन व्हेरिएंटमध्ये मिळेल. हिरो मोटोकॉर्पची ही बाईक आधीपेक्षा किती बदलली आहे? याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

या बाईकमध्ये नवीन बदलाबद्दल बोलायचे झाल्यास आता इंजिन OBD2 कॉम्प्लायंट झाले असून बाईक E20 इंधनावरही धावू शकणार आहे. एवढेच नाही तर आता तुम्हाला या बाईकमध्ये स्ट्राइप्ससह अपडेटेड ग्राफिक्स पाहायला मिळतील. याशिवाय, एक नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे, ज्यावर तुम्हाला रियल टाइम मायलेज आणि कमी इंधन इंडिकेटर यांसारखी अनेक महत्त्वाची माहिती मिळेल. तसेच, मोबाईल चार्ज करण्यासाठी यूएसबी (USB) पोर्ट देण्यात आला आहे.

किंमत किती?हिरो मोटोकॉर्पच्या या बाईकचे अपडेटेड व्हर्जन 82 हजार 348 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह (एक्स-शोरूम) लाँच करण्यात आले आहे. या किमतीत तुम्हाला या बाईकचे ड्रम व्हेरिएंट मिळेल. याचबरोबर, या बाईकच्या डिस्क व्हेरिएंटची किंमत 86 हजार 348 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

नवीन कलर ऑप्शनहिरो मोटोकॉर्पने Glamour 2023 मॉडेलसाठी नवीन कलर ऑप्शन आणले केले आहेत, ज्यात Candy Blazing Red, Techno Blue-Black आणि Sports Red-Black यांचा समावेश आहे.

इंजिन आणि मायलेजया हिरो बाईकमध्ये तुम्हाला 125 cc सिंगल सिलिंडर एअर-कूल्ड इंजिन मिळेल, जे 7500rpm वर 10.68 bhp पॉवर आणि 6000 rpm वर 10.6 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन आता OBD2 कंप्लायंट आहे आणि बाईक आता E20 इंधनावर देखील चालू शकते. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 63 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.

बाईकची स्पर्धा कोणासोबत?या किमतीच्या रेंजमध्ये Hero Glamour ची बाजारात थेट स्पर्धा टीव्हीएस कंपनीच्या TVS Raider 125, Bajaj Pulsar 125 आणि होंडाची Honda Shine यांच्याशी आहे.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पbikeबाईकAutomobileवाहन