शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

नव्या लूकमध्ये लाँच झाली Kawasaki ची 650CC पॉवरफुल बाईक; Smartphone ला देखील होते कनेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 5:00 PM

Kawasaki ची अतिशय प्रसिद्ध झालेली बाईक नव्या लूकमध्ये झाली लाँच. पाहा किती आहे किंमत आणि काय आहे विशेष.

ठळक मुद्देKawasaki ची अतिशय प्रसिद्ध झालेली बाईक नव्या लूकमध्ये झाली लाँच.

जपानची दुचाकी वाहन उत्पादक कंपनी  Kawasaki नं भारतीय बाजारपेठेत आपली प्रसिद्ध स्पोर्ट्स बाईक Kawasaki Ninja 650 चं फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलं. अतिशय आकर्षक लूक, डिझाईन आणि इंजिन क्षमतेसह येणाऱ्या बाईकची किंमत 6.61 लाख रूपये आहे. गेल्या  काही मॉडेल्सच्या तुलनेत या बाईकची किंमत अधिक आहे. 

मागील मॉडेलची किंमत 6.54 लाख रुपये आहे. कंपनीने हे नवीन मॉडेल गेल्या महिन्यातच जागतिक बाजारात सादर केले होते, ज्यात काही विशेष बदल करण्यात आले आहेत. नव्या कलर्ससह अपडेटेड फीचर्स या बाईकला अधिक खास बनवतात. यामध्ये सिग्नेचर लाईम ग्रीन पेंट सोबत लोअर फेयरिंगवर व्हाईट हायलाईट्स देण्यात आले आहे. शिवाय, बॉडीवर्कच्या सभोवतालचे लाल पिनस्ट्राइप ग्राफिक्स या बाईकला आणखी सुंदर बनवतात. Kawasaki Ninja 650 मध्ये पर्ल रोबोटिक व्हाईट कलरही मिळतो. याणध्ये व्हाईटसोबत मेटॅलिक ग्रे आणि लाईम ग्रीनही सामील आहे. 

या बाईकमध्ये फुल-एलईडी हेडलँप आणि टेल लँपसह ब्लूटूथ कनेक्टिव्हीटीही देण्यात आली आहे. नव्या निंजामध्ये 4.3 इंचाचा फुल कलर टीएफटी डिस्प्लेही आहे. या बाईकच्या इंजिनमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कंपनीनं यामध्ये  649cc पॅरलल ट्विन, लिक्विड कुल्ड इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 66.4bhp ची पॉवर आणि 64Nm चा टॉर्क जनरेट करतं.

सुरक्षेचीही काळजीकंपनीनं या बाईकमध्ये सुरक्षेचीही काळजी घेतली आहे. सस्पेन्शन ड्युटी म्हणून याच्या पुढील बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूला एक मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आलं आहे. ड्युअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) असलेल्या या बाईकमध्ये पुढील बाजूला ट्विन डिस्क आणि मागील बाजूला एक सिंगल डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. 

टॅग्स :Kawasaki Bikeकावासाकी बाईकJapanजपानIndiaभारतbikeबाईक