शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Audi च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील महिन्यात येणार नवीन एसयूव्ही; टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 12:36 IST

2022 Audi Q3 To Launch In September : बाजारात ऑडी Q3 ची स्पर्धा BMW X1, Mercedes-Benz GLA आणि Volvo XC40 सारख्या कारसोबत होणार आहे.

नवी दिल्ली : जर्मन कार निर्माता कंपनी ऑडीचे भारतीय कार बाजारावर बरेच फोकस करत आहे. ऑडी इंडियाने अलीकडेच ऑडी ए 8 एल (Audi A8 L) फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे. आता ऑल-न्यू Q3 लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. 2022 ऑडी Q3 चा कंपनीच्या सोशल मीडिया हँडलवरून अधिकृतपणे टीझर पोस्ट करणयात आला आहे.

पुढील महिन्यात (सप्टेंबर 2022) भारतात 2022 ऑडी Q3 लाँच होण्याची शक्यता आहे. नवीन जनरेशनच्या ऑडी Q3 ने 2019 मध्ये जागतिक पदार्पण केले. मात्र, ही कार भारतात लाँच होण्यास विलंब झाला आहे. पण, आता कंपनी भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. बाजारात ऑडी Q3 ची स्पर्धा BMW X1, Mercedes-Benz GLA आणि Volvo XC40 सारख्या कारसोबत होणार आहे.

नवीन ऑडी Q3 ची डिझाइननवीन ऑडी Q3 चे डिझाइन कंपनीच्या फ्लॅगशिप एसयूव्ही Q8 वरून प्रेरित आहे. समोरच्या बाजूला कारला आठ व्हर्टिकल क्रोम स्लॅट्ससह ऑक्टागन शेपची ग्रिल देण्यात आली आहे. या प्रीमियम एसयूव्हीला मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प, मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स, स्लोपिंग रूफलाइन आणि डीआरएलसह एलईडी टेल लॅम्प मिळतील.

नवीन जनरेशन ऑडी Q3 मध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 360-डिग्री पार्किंग कॅमेरा यासह अनेक शानदार फीचर्स मिळणार आहेत. कारच्या बूटमध्ये अॅडजस्टेबल फ्लोअर मिळेल. यात 675-लिटरचे लगेज स्पेस मिळू शकते, जी मागील सीट फोल्ड करून 1,526-लिटरपर्यंत वाढवता येते.

नवीन ऑडी Q3 चे इंजिनइंडिया-स्पेक ऑडी Q3 मध्ये 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल, जे फोक्सवॅगन टिगुआन आणि स्कोडा कोडिएकमध्ये देखील मिळते. हे इंजिन 187 बीएचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. हे 7-स्पीड डीसीटीसह जोडले जाऊ शकते. इंटरनॅशनल-स्पेक ऑडी Q3 मध्ये 1.5L टर्बो पेट्रोल (150bhp), 2.0L टर्बो पेट्रोल आणि 2.0L टर्बो डिझेल इंजिन असे 3 इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत.

टॅग्स :AutomobileवाहनAudiआॅडीAutomobile Industryवाहन उद्योग