शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

Renault ची सर्वात स्वस्त कार Kwid नव्या रूपात लाँच; मिळतात हे खास फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 8:42 PM

Renault Kwid : कंपनीनं केली kwid नव्या रूपात लाँच. नव्या कारमध्ये करण्यात आले अनेक बदल. 

ठळक मुद्देकंपनीनं केली kwid नव्या रूपात लाँच. नव्या कारमध्ये करण्यात आले अनेक बदल. 

फ्रेंच प्रमुख वाहन निर्माता Renault नं आपल्या स्वस्त कार Kwid चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल भारतीय बाजारात लाँच केले आहे. कंपनीने नवीन क्विडमध्ये बरेच बदल केले आहेत जे या कारला पूर्वीच्या कारच्या तुलनेत अधिक उत्तम बनवतात. आकर्षक स्पोर्टी लुक आणि मजबूत इंजिन असलेल्या या कारची सुरुवातीची किंमत 4.06 लाख रुपयांपासून ते 5.51 लाख रुपयांपर्यंत आहे.

नव्या Renault Kwid मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काही नवे फीचर्स देण्यात आले आहेत. जरी डिझाइन, आकार आणि इंजिन यंत्रणा इत्यादी सारखीच आहेत, तरी कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.  कंपनीने भारतात आपली 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर क्विडचं अपडेटेड मॉडेल लाँच केलं आहे. नवीन क्विडची किंमत जास्त असली तरी त्यात काही खास फीचर्सही देण्यात आले आहेत.

काय आहेत फीचर्स?या कारचे सर्व व्हेरिअंट्स ड्युअल फ्रंट एअरबॅगसह येतात, याशिवाय ड्रायव्हर साइड पायरोटेक प्रीटेन्शनर देखील त्यात देण्यात आले आहे. अन्य स्टॅडर्ड सेफ्टी फिचर्सम्हणू यामध्ये रिअर सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन, एबीएस आणि सीट बेल्ट रिमाईंडरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

ड्युअल टोन कलर स्कीमनवी रेनो ही कार ड्युअल डोन कलर स्कीम व्हाईट सोबत ब्लॅक रुफमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये इलेक्ट्रीक आऊट साईड रिअल व्ह्यू मिरर (ORVM) सोबत रात्री ड्राईव्हसाठी IRVM देण्यात आलं आहे. स्मार्टफोन कनेक्टिव्हीटीसह यामध्ये 8 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम, रिअर सीट आर्मरेस्ट आणि रिअर पार्किंग कॅमेरा सारखे फीचर्स या कारला आणखी चांगलं बनवतात.

इंजिनमध्ये बदल नाहीया कारच्या इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारे बदल करण्यात आलेला नाही. ही कार 0.8 लीटर आणि 1.0 लीटर इंजिन पर्यायांसह येते. याचं 0.8 लीटर पेट्रोल इंजिन 54bhp ची पॉवर आणि 72Nm ता टॉर्क जनरेच करतं. हे इंजिन केवळ 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येतं. तर 1.0 लीटर इंजिन 68bhp ची पॉवर आणि 91Nm चा टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतं.

किती आहे किंमत? 

Renault Kwid RXE 0.8L –  Rs 4,06,500 

Renault Kwid RXL 0.8L – Rs 4,36,500 

Renault Kwid RXT 0.8L – Rs 4,66,500 

Renault Kwid RXL 1.0L MT – Rs 4,53,600 

Renault Kwid RXL 1.0L EASY-R –  Rs 4,93,600 

Renault Kwid RXT 1.0L MT option –  Rs 4,90,300 

Renault Kwid CLIMBER 1.0L MT option –  Rs 5,11,500 

Renault Kwid RXT 1.0L EASY- R option – Rs 5,30,300 

Renault Kwid CLIMBER 1.0L EASY-R option –  Rs 5,51,500

टॅग्स :Renaultरेनॉल्टcarकारIndiaभारतPetrolपेट्रोल