स्वच्छतेचे भारतीयांना काय वावडे आहे कुणास ठाऊक? जे वैयक्तिक स्वच्छतेकडेही दुर्लक्ष करतात, त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको; पण जे वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही दिसतात, असेही अनेक लोक सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत मात्र कमालीची हलगर्जी करताना आढळता ...
अवनीने गत काही वर्षात तब्बल १३ जणांचा बळी घेतल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. दोनच दिवसांच्या अंतराने दोन वाघांना ठार करण्यात आल्याने मानव आणि वन्य जीवांमधील संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...
सरकारतर्फे निश्चलनीकरणाची जी विविध उद्दिष्टे सांगण्यात आली होती त्यामध्ये ‘कॅशलेस इकॉनॉमी’ची निर्मिती हेदेखील एक उद्दिष्ट होते. पुढे सरकारनेच त्याचे ‘लेस कॅश इकॉनॉमी’मध्ये रूपांतर केले, हा भाग अलहिदा! ...
धनत्रयोदशीच्या दिवशी राजधानी दिल्लीत तब्बल सहा किलोमीटर लांबीची वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपुलांचे जाळे आणि मेट्रो, मोनोरेल, स्कायबस यांसारखी वाहतुकीची नवनवी साधने निर्माण केल्यानंतरही ही परिस्थिती आहे. ...
कार्ड पेमेंट क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या मास्टरकार्डने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तक्रार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे केली आहे. ...
१९९७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ३९४३ अर्भकांचे गर्भातच मृत्यू झाल्याची आणि २००० ते स्पटेंबर २०१८ या कालावधीत २३० मातांचा मृत्यू झाल्याची माहितीही अॅड. साने यांनी केलेल्या अर्जाच्या उत्तरादाखल मिळाली आहे. ...
केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान वाद नेमका कोणत्या कारणास्तव उफाळला, याबाबत विविध मते व्यक्त होत असली तरी, तोंडावर येऊन ठेपलेली लोकसभा निवडणूक हेच त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे दिसत आहे. ...