मेघना ढोके. ‘लोकमतसखी.कॉम’च्या संपादक आहेत. पत्रकार-अनुवाद-लेखक अशी त्यांची ओळख. २५ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. कॉन्फ्लिक्ट रिपोर्टिंग’ हा त्यांच्या वार्तांकनाचा विषय आहे. रिपोर्ताज शैलीत सामाजिक विषयावर संशोधनपर लेखन करतात. याशिवाय क्रिकेट, खाद्यसंस्कृती आणि सिनेमासह पॉप्युलर कल्चरचे सामाजिक परिणाम हे त्यांच्या आवडीचे विषय. आसाम एनआरसीविषयी त्यांनी लिहिलेले ‘मोई कुन? आमी कुन?’ हे पुस्तक गाजले आहे. अरुण साधू शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. अरुणाचल प्रदेश आणि चीन यासंदर्भात लिहिलेल्या ‘जो है, वो है,’ या लेखाला आशिया-पॅसिफिक स्तरावरचा एशियन डेव्हलपमेण्ट बॅँकेचा ‘बेस्ट डेव्हलपमेण्ट जर्नलिस्ट ऑफ द इयर’ म्हणजेच ‘डाजा’ हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचसाठी जपान-टोक्यो येथील कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी विशेष फेलोशिपही मिळाली होती. तसेच अमेरिकन सरकारची ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशीप प्रोग्रॅम’ ही विशेष फेलोशिपही मिळालेली असून त्याअंतर्गत ‘मीडिया आणि डेमोक्रसी’ याविषयावरचा अभ्यास त्यांनी केला आहे. पां. वा. गाडगीळ विकासात्मक लेखन पुरस्कारही अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. म्हणूनही त्यांची पुस्तकं गाजलेली आहेत. आय ॲम अ टॅक्सी, सॅक्रेड लीफ, फेलानी, डेमोक्रॅसीज इलेव्हन-भारतीय क्रिकेटची महान गाथा ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं आहेत.Read more
Coronavirus: धनपाडा, ता. पेठ. जि. नाशिक या गावाने एकजूट करून कोरोनाला अद्यापही गावाबाहेरच रोखून धरले आहे. गावकऱ्यांनी एकत्र येऊन केलेल्या मुकाबल्याची कहाणी... ...
बिरुबाला राभा. आसामधल्या ७२ वर्षांच्या या आजी. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. जादूटोणा आणि डायन प्रथेविरुद्ध लढणाऱ्या त्या आजींची गोष्ट. ...
Lovlina borgohain लवलीनाचं गाव छोटुंसं, वडील शेतकरी, परिस्थिती अगदीच बेताची, कोरोनाकाळात तर आई गंभीर आजारी पण म्हणून ही मुलगी मागे हटली नाही, उलट नेटानं तयारीला लागली.. Tokyo Olympics 2021, India @ Tokyo Olympics 2021 ...
वेटलिफ्टर साईखोम मीराबाई चानू. (Chanu Saikhom Mirabai) भारताची वेटलिफ्टर स्टार. तिनं देशासाठी ऑलिम्पिक पदक यंदा जिंकणारच हा शब्द खरा केला..(India at Tokyo Olympics 2021) ...