मेघना ढोके. ‘लोकमतसखी.कॉम’च्या संपादक आहेत. पत्रकार-अनुवाद-लेखक अशी त्यांची ओळख. २५ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. कॉन्फ्लिक्ट रिपोर्टिंग’ हा त्यांच्या वार्तांकनाचा विषय आहे. रिपोर्ताज शैलीत सामाजिक विषयावर संशोधनपर लेखन करतात. याशिवाय क्रिकेट, खाद्यसंस्कृती आणि सिनेमासह पॉप्युलर कल्चरचे सामाजिक परिणाम हे त्यांच्या आवडीचे विषय. आसाम एनआरसीविषयी त्यांनी लिहिलेले ‘मोई कुन? आमी कुन?’ हे पुस्तक गाजले आहे. अरुण साधू शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. अरुणाचल प्रदेश आणि चीन यासंदर्भात लिहिलेल्या ‘जो है, वो है,’ या लेखाला आशिया-पॅसिफिक स्तरावरचा एशियन डेव्हलपमेण्ट बॅँकेचा ‘बेस्ट डेव्हलपमेण्ट जर्नलिस्ट ऑफ द इयर’ म्हणजेच ‘डाजा’ हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचसाठी जपान-टोक्यो येथील कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी विशेष फेलोशिपही मिळाली होती. तसेच अमेरिकन सरकारची ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशीप प्रोग्रॅम’ ही विशेष फेलोशिपही मिळालेली असून त्याअंतर्गत ‘मीडिया आणि डेमोक्रसी’ याविषयावरचा अभ्यास त्यांनी केला आहे. पां. वा. गाडगीळ विकासात्मक लेखन पुरस्कारही अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. म्हणूनही त्यांची पुस्तकं गाजलेली आहेत. आय ॲम अ टॅक्सी, सॅक्रेड लीफ, फेलानी, डेमोक्रॅसीज इलेव्हन-भारतीय क्रिकेटची महान गाथा ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं आहेत.Read more
ईशान्य भारतात उर्वरित देशापेक्षा विकास मंदगतीने पोहोचला, पण तिथल्या मतदारांचा उत्साह मात्र लोकशाहीसाठी आश्वासक आहे. देशात सर्वाधिक मतदान ईशान्य भारतीय राज्यांत होतं आणि ही गोष्ट फक्त आजचीच नाही, तर साधारण १९६१ पासून आजवर हेच चित्र आहे. ...
रस्ते ओळखीचे, पायाखालचे होतात. अगदी दोन दिवसांत ओळखीचे वाटू लागतात इथले चौराहे, नाके, नुक्कड आणि गल्ल्या. इलेक्ट्रिक रिक्षाला ‘चलो सवारी’ म्हटलं की, शहरभर उभं-आडवं फिरता येतं; आणि मग ओळखीची होऊ लागते अयोध्या. ...
इंग्लंडला हरवणं सोपं नव्हतंच, पण ते सहजसोपं करुन दाखवलं अफगाण टीमने. आजही त्या देशात तालिबानी राजवट आहे, तालिबानचा जगातल्या अनेक गोष्टींना विरोध असला तरी क्रिकेटला पाठिंबा आहे. ...