मुळात बंदर असलेल्या मुंबईमध्ये समुद्रमार्गे मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या मालाची आयात-निर्यात होते. अवजड, महाकाय बोटींचा हा ट्रॅफिक प्रचंड आहे. एखाद्या बोटीचे टायमिंग हुकले तरी समुद्रात वाहतूक कोंडी होऊ शकते; पण याची एक शिस्तबद्ध व्यवस्था आहे. ...
डोक्यावर जे.जे. फ्लायओव्हर आणि त्याच्या सावलीत गजबजलेल्या मुंबईतील मोहम्मद अली रोडवरील मिनारा मशिदीच्या समोरच्या बाजूने पायधुनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जात उजवीकडे वळले की आपली पावले आपोआपच समोरच्या फुटपाथवर जातात. ...