गेल्या तीन वर्षात ठाणे शहरातील गुन्हेगारी पाच टक्क्यांपर्यत घटल्याचा दावा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गुरूवारी केला. पूर्वी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात महिन्याला ७० ते ८० सोनसाखळी जबरी चोरीचे गुन्हे दाखल होत होते. हे प्रमाण आता अगदी नगण ...
गेली चार महिने अधीक्षकाच्या प्रतिक्षेत असलेल्या ठाण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला आता नितीन घुले यांच्या रुपाने पूर्णवेळ अधीक्षक मिळाला आहे. तर पुण्याच्या अधीक्षकपदी गडचिरोलीचे डॉ. बी. एच. तडवी यांची बदली राज्य शासनाने केली आहे. ...
आपल्या सात वर्षीय मुलाचा खून करुन स्वत:ही गळफास घेऊन शोमीक घोष या संगीत शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना कासारवडवली येथे बुधवारी घडली. दुसरी पत्नी दिया हिच्या विरहातून त्याने हे पाऊल उचलल्याचे आपल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. ...
सोनू जलाल या कुख्यात बुकीचे कोणकोण साथीदार आहेत? पैशांची देवाणघेवाण ते कशा प्रकारे करत होते? अशा अनेक बाबींचा उलगडा होणे बाकी असल्यामुळे ठाणे पोलिसांनी बुधवारी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ...
सुमारे १०९ गुंठे जमीन भलत्याच व्यक्तींच्या नावावर झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर महसूल विभागाने संबंधित जमिनीचा सातबारा मूळ जमीनमालकाच्या नावावर करून तशी फेरफार नोंदही केली आहे. ...
अनैतिक संबंधातून ठाण्यातील एका तरुणाचा खून करुन बंगलोरला पसार झालेल्या महिलेला ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये ताब्यात घेतले आहे. ...
अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार कल्याणचा लॉज ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सिलबंद केला आहे. याच लॉजमधून सहा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीसह चार मुलींची ठाणे पोलिसांनी सुटका केली होती. ...