गलेलठ्ठ पगार झाला, की कुठलेही नियोजन न करता हा पैसा उडवायचा आणि महिन्याच्या शेवटी पगाराची वाट पाहत शिमगा करीत राहायचे हा जसा कॉल सेंटरमधील काही नवतरुणांच्या जगण्याचा भाग झाला आहे, तशीच अवस्था मराठवाड्यात उसाचे पीक घेणा-या शेतक-यांची आहे. ...
राज्यातील अनाथांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय गेल्या सोमवारी राज्य शासनाने घेतला. गट अ ते ड पर्यंतच्या सर्व नोकºयांसाठी हे आरक्षण लागू असेल. जन्म घेतला त्याचक्षणी आई-बापाने नाकारलेल्यांसाठी ...
अन्याय करणारा जेवढा जबाबदार तेवढाच जबाबदार ते सहन करणारा देखील असतो. गेल्या २२ दिवसांपासून औरंगाबादेत कचरा कोंडी निर्माण झाली आहे. सर्वसामान्य औरंगाबादकरांना याचे काहीच सोयरसूतक नाही. घरातला कचरा बाहेर जातोय बस्स. तो गल्लीतच रस्त्यावर पडला काय किंवा ...
नारेगावकर रस्त्यावर उतरले की काहीतरी आश्वासन द्यायचे, वेळ मारून न्यायची. कधी प्रक्रियेचे गाजर दाखवायचे, तर कधी दुसरी जागा शोधण्याचे. करायचे काहीच नाही. पुन्हा येरे माझ्या मागल्या. पालिकेचा वर्षानुवर्षे हा खेळ सुरू आहे आणि तो नारेगावकरांनी पुरता ओळखला ...
औरंगाबादेतील कचरा गेल्या आठ दिवसांपासून जागच्या जागी पडून आहे. पर्यटनाची राजधानी अक्षरश: कचर्यात बुडाली आहे. कचर्याचा हा प्रश्न आजचा नाही. २००३ साली उच्च न्यायालयाने नारेगावातील कचरा डेपो बंद करण्याचे आदेश दिले होते. ...
हातभट्टीच्या दारूत विषबाधेसारखे धोके जास्त असतात. म्हणूनच सरकारने त्यावर ‘देशी दारू’चा उतारा शोधला. यात उसाच्या मळीपासून तयार होणारे अल्कोहोल विरळ करून त्यात मोसंबी किंवा संत्र्याचा अर्क टाकला जातो म्हणे. त्यालाच आपण मोसंबी किंवा नारंगी देशी दारू म्ह ...
माणसांचे तोंडावर एक आणि मागे दुसरेच असते. माणसे माणसांनाही सोडत नाहीत. तुम्ही चौकाचौकांत ज्याला दररोजच्या जेवणावळी समजता ते माणसांनी खाऊन खाऊन उरलेले किंवा खराब झालेले अन्न असते. ...
एखाद्या जखमीला पोलिसाने आॅक्सिजन पम्पिंग करावे, हे सांगणारा कायदा नाही. अगदी तसेच रस्त्यावर पडलेल्या जखमीला तात्काळ मदत करावी, हेही सांगणारा कुठला कायदा नाही. ...