Visit of Sillod Municipal Council to Nashik Municipal Corporation Project | सिल्लोड नगर परिषदेची नाशिक मनपा प्रकल्पाला भेट

सिल्लोड नगर परिषदेची नाशिक मनपा प्रकल्पाला भेट

सिल्लोड : सिल्लोड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, प्रशासकीय अधिकारी व नगरसेवकांनी नाशिक मनपा प्रकल्पाला भेट देऊन सुका व ओला कचरा प्रक्रिया तसेच कचऱ्यापासून इंधन, खत, बायोगॅस, विद्युत निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली. त्यासोबतच येथील १३७ दशलक्ष प्रतिदिन जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून सखोल माहिती जाणून घेतली.

घनकचरा व्यवस्थापनात नाशिक मनपाचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो. नाशिक मनपाच्या धर्तीवर सिल्लोड येथे उपाययोजना करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत करावयाच्या उपाययोजनांबाबत सिल्लोड नगर परिषदेच्यावतीने राज्यमंत्री सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते.

यावेळी मुख्याधिकारी सय्यद रफिक, नगर परिषदेतील गटनेते नंदकिशोर सहारे, नगरसेवक रईस मुजावर, मोईन पठाण यांच्यासह नगरपरिषदेतील अभियंता ओम लहाने, राहुल राजपूत, रणजित भालेराव, विशाल पाटील आदींची उपस्थिती होती.

खडकपूर्णा वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे...

येत्या काळात सिल्लोड शहरात खडकपूर्णा वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे असल्याने शहराला दररोज पाणीपुरवठा कसा करता येईल यासाठी नाशिक येथील १३७ दशलक्ष प्रतिदिन जलशुद्धीकरण केंद्राचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी नगर परिषदेने एकदिवसीय दौरा आयोजित केला होता, अशी माहिती उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी दिली.

----------

(फोटो : सिल्लोड नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक मनपा प्रकल्पाला भेट देऊन येथील घनकचरा, जलशुद्धीकरण व इतर प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, मुख्याधिकारी सय्यद रफिक, नगर परिषदेचे गटनेते नंदकिशोर सहारे, नगरसेवक रईस मुजावर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Visit of Sillod Municipal Council to Nashik Municipal Corporation Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.