घाटनांद्रा येथील विनाअनुदानित शिक्षकांचा शाळेत घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:06 AM2021-03-09T04:06:36+5:302021-03-09T04:06:36+5:30

विनाअनुदानित शाळेतील शिक्षक गेल्या काही वर्षांपासून काम करत आहेत. या शिक्षकांना अनुदान नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ...

Unaided teachers in Ghatnandra ring school bells | घाटनांद्रा येथील विनाअनुदानित शिक्षकांचा शाळेत घंटानाद

घाटनांद्रा येथील विनाअनुदानित शिक्षकांचा शाळेत घंटानाद

googlenewsNext

विनाअनुदानित शाळेतील शिक्षक गेल्या काही वर्षांपासून काम करत आहेत. या शिक्षकांना अनुदान नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रचलित नियमांप्रमाणे शिक्षकांना अनुदान द्यावे या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. सोमवारी झालेल्या घंटानाद आंदोलनावेळी मुख्याध्यापक शाहीर गायकवाड, पर्यवेक्षक बी. एस. मेटे, जितेंद्र गायकवाड, रितेश महाले, लक्ष्मीकांत साळवे, विशाल झलवार, रवींद्र चौरे, विजय भिवसणे, श्रीराम पवार, साहेबराव मोरे, भागवत मोरे, मुख्याध्यापक भरत सुपेकर, विजय साबदे, अविनाश नर्हेराव, संदीप मोरे, संदीप पिवळ, अमोल चौधरी, योगेश पवार, सविता पवार, रूपाली पाटील, कय्युम शहा, अनिल घुंगरड, शब्बिर शेख, अन्वर पठाण आदींची उपस्थिती होती.

फोटो : घाटनांद्रा येथील विनाअनुदानित असलेल्या इंद्रगढी शाळेत घंटानाद करताना शिक्षक कर्मचारी दिसत आहेत.

Web Title: Unaided teachers in Ghatnandra ring school bells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.