टँकरचालकास लोखंडी टॉमीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:06 AM2021-01-25T04:06:56+5:302021-01-25T04:06:56+5:30

औरंगाबाद : डिझेल देण्यास नकार देणाऱ्या टँकर चालकांना हायवाचालक भरत जाधव व त्याच्या भावाने लाकडी दांडा व लोखंडी टॉमीने ...

Tanker driver beaten with iron tommy | टँकरचालकास लोखंडी टॉमीने मारहाण

टँकरचालकास लोखंडी टॉमीने मारहाण

googlenewsNext

औरंगाबाद : डिझेल देण्यास नकार देणाऱ्या टँकर चालकांना हायवाचालक भरत जाधव व त्याच्या भावाने लाकडी दांडा व लोखंडी टॉमीने मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी २० जानेवारीला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हर्सूल- चौका रस्त्यावर समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ घडली. चालक शेख फिरोज शेख दाऊद (वय २३, रा. नायगाव) हे पाण्याचे टँकर घेऊन जात असताना भरत जाधव याने टँकरसमोर हायवा उभी केली व डिझेलची मागणी केली. फिरोजने डिफेल देण्यास असमर्थता दर्शविली. तेव्हा त्यास व दुसरा टँकरचालक मोहसीन या दोघांना मारहाण करण्यात आली व नाल्यात फेकून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी जखमी टँकरचालक शेख फिरोज यांच्या तक्रारीवरुन हर्सूल ठाण्यात हायवाचालक भरत जाधव, त्याचा भाऊ व अन्य चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Tanker driver beaten with iron tommy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.