Soygaon Counting: Twelve tables, ten rounds | सोयगाव मतमोजणी : बारा टेबल, दहा फेऱ्या

सोयगाव मतमोजणी : बारा टेबल, दहा फेऱ्या

आमखेडा ग्रामपंचायतीपासून पहिली फेरी सुरू करण्यात येणार असून जरंडी, निंभोरा ग्रामपंचायतींसाठी पहिल्या फेरीत मतमोजणी करण्यात येणार आहे. एका फेरीसाठी तीन ग्रामपंचायती याप्रमाणे मतमोजणी होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी घाणेगावतांडा, घोसला, गलवाडा, आणि पहुरी एका प्रभागासाठी मतमोजणी होईल. तिसऱ्या फेरीसाठी फर्दापूर, कवली व चौथी फेरीत गोंदेगाव, बनोटी व दस्तापूर ग्रामपंचायतींच्या प्रभागाचा समावेश आहे. पाचव्या फेरीत किन्ही, सावळद-बारा, मोहलाई, पिंपळवाडी या गावांचा समावेश आहे. अशी एकूण दहा फेऱ्यांत मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे, असे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी सांगितले.

-------------

छायाचित्र - तहसीलदार प्रवीण पांडे मतमोजणीच्या पूर्वतयारीची पाहणी करताना.

Web Title: Soygaon Counting: Twelve tables, ten rounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.