नगररोडवर साईड पंखे पडले उघडे

By | Published: December 3, 2020 04:11 AM2020-12-03T04:11:52+5:302020-12-03T04:11:52+5:30

------------------------------- भरमसाठ वीज बिलामुळे ग्राहक त्रस्त वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात महावितरणकडून भरमसाठी वीज बिले दिल्यामु‌ळे ग्राहक आडचणीत ...

Side fans fell open on the city road | नगररोडवर साईड पंखे पडले उघडे

नगररोडवर साईड पंखे पडले उघडे

googlenewsNext

-------------------------------

भरमसाठ वीज बिलामुळे ग्राहक त्रस्त

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात महावितरणकडून भरमसाठी वीज बिले दिल्यामु‌ळे ग्राहक आडचणीत सापडले आहेत. या परिसरात बहुतांश कामगार वर्ग वास्तव्यास असून, लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला. काम नसल्यामुळे अनेक कामगारांची बिले थकीत आहेत. महावितरण थकीत बिलावर व्याजाची आकारणी करते. त्यामुळे ग्राहकांत असंतोषाचे वातावरण आहे.

---------------------

पत्रा कॉलनीत सार्वजनिक नळ द्या

वाळूज महानगर : वाळूजच्या पत्रा कॉलनीत सार्वजनिक नळ देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या वसाहतीत गरीब नागरिकांनी बॉण्डवर भूखंड खरेदी करून कच्ची-पक्की घरे बांधली आहेत. ग्रामपंचायत या वसाहतीत पाणी पुरवठा करण्यासाठी अनामत रक्कम भरण्याची सक्ती करते. या वसाहतीत सार्वजनिक नळ देऊन नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्याची मागणी होत आहे.

-------------------------------

सिडको वाळूज महानगरात श्रमदान

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील सह्याद्री वृक्ष बँकेचे पदाधिकारी व पर्यावरणप्रेमींच्या मदतीने या परिसरात वाळवी लागलेल्या झाडांना श्रमदानातून चुना व गेरू लावला जात आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे असून, त्यातील अनेक झाडांना वाळवी लागत आहे. वाळवीपासून झाडांचे संरक्षण व्हावे, यासाठी पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. सकाळी ६ ते ९ वाजे दरम्यान श्रमदान करून झाडांना चुना व गेरू लावला जात आहे.

--------------------------

खाम नदीवरील पुलास संरक्षक कठडे उभारा

वाळूज महानगर : वळदगाव-पंढरपूरला जोडणाऱ्या खाम नदीवरील पुलाला संरक्षक कठडे उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या पुलावरील संरक्षक कठडे जोरदार पावसामुळे वाहून गेले. रात्री पुलावरून ये-जा करताना दुचाकीस्वार पुलाखाली पडण्याच्या घटना घडत आहेत. दुचाकीस्वार व नागरिकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी संरक्षक कठडे उभारण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

-------------------------------

Web Title: Side fans fell open on the city road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.