Shiv Sena dominates Kerala Gram Panchayat | केऱ्हाळा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व

केऱ्हाळा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व

या निवडणुकीत वयाच्या २१ व्या वर्षी पहिलीच निवडणूक लढवत असलेल्या अबुतालेफ गनी पटेल या युवकाने अटीतटीच्या लढतीत १९ मतांनी विजय मिळवला. राजकारणात पहिल्याच वर्षी प्रदार्पण करुन तगड्या उमेदवाराचा सूर्यभान बन्सोड या युवकाने पराभव केला. विद्यमान सरपंच कविता वाघ यांचे पती अर्जुन वाघ यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला. विद्यमान उपसरपंच दत्ता कुडके यांनी भाजपला राम राम ठोकत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करुन पती, पत्नी असा दोन ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांचा पराभव तर पत्नी सविता कुडके यांनी विजय संपादन केला.

--- विजयी उमेदवार ---

केऱ्हाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सूर्यभान रंगनाथ बन्सोड, शिवनंदा अजिनाथ भिंगारे, अबुतालेफ गनी पटेल, शेख करीम शेख मेहबूब, बिनाबी मुकिमखा पठाण, अशोक जयवंतराव पांढरे, उषा क्रिष्णा पांढरे, सविता दत्ता कुडके, अर्जुन सीताराम वाघ, शेख हसीना चांद, कमलबाई सुखदेव बांबर्डे, साहेबराव बंडू बांबर्डे, सखुबाई लक्ष्मण दुधे यांनी विजय मिळवला.

----- कॅप्शन : केऱ्हाळा ग्रामपंचायतमधील शिवशाही पॅनलचे विजयी उमेदवार.

Web Title: Shiv Sena dominates Kerala Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.