शर्वरी भारतीय बॉक्सिंग संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 01:00 AM2019-09-14T01:00:23+5:302019-09-14T01:00:39+5:30

रोहतक येथे आज झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन पंच मारणारी औरंगाबादची प्रतिभावान खेळाडू शर्वरी कल्याणकर हिची भारतीय ज्युनिअर संघात निवड झाली आहे. दुबई येथे ८ ते १९ आॅक्टोबरदरम्यान होणाऱ्या ज्युनिअर आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत शर्वरी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. औरंगाबाद येथील साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात सराव करणाºया शर्वरी कल्याणकर हिने जबरदस्त कामगिरी करताना रोहतक येथे आज संपलेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत ६७ ते ७० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला. ही कामगिरी करतानाच तिने दुबई येथील ज्युनिअर आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान निश्चित केले. अशी जबरदस्त कामगिरी करणारी शर्वरी कल्याणकर ही मराठवाड्याची पहिली खेळाडू आहे.

Sharwari in the Indian boxing team | शर्वरी भारतीय बॉक्सिंग संघात

शर्वरी भारतीय बॉक्सिंग संघात

googlenewsNext
ठळक मुद्देज्युनिअर आशियाई स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व : राष्ट्रीय स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

औरंगाबाद : रोहतक येथे आज झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन पंच मारणारी औरंगाबादची प्रतिभावान खेळाडू शर्वरी कल्याणकर हिची भारतीय ज्युनिअर संघात निवड झाली आहे. दुबई येथे ८ ते १९ आॅक्टोबरदरम्यान होणाऱ्या ज्युनिअर आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत शर्वरी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
औरंगाबाद येथील साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात सराव करणाºया शर्वरी कल्याणकर हिने जबरदस्त कामगिरी करताना रोहतक येथे आज संपलेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत ६७ ते ७० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला. ही कामगिरी करतानाच तिने दुबई येथील ज्युनिअर आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान निश्चित केले. अशी जबरदस्त कामगिरी करणारी शर्वरी कल्याणकर ही मराठवाड्याची पहिली खेळाडू आहे. राष्ट्रीय स्पर्धेच्या कामगिरीदरम्यान तिने हरियाणा, पंजाबच्या खेळाडूंना धूळ चारली. तिने उपउपांत्यपूर्व फेरीत दिल्ली, उपांत्यपूर्व फेरीत हिमाचल प्रदेश, उपांत्य फेरीत हरियाणा आणि अंतिम फेरीत पंजाबच्या खेळाडूला धूळ चारत सुवर्णपदकावर आपले नाव
कोरले. शर्वरी कल्याणकर हिने याआधी २४ ते २८ जुलैदरम्यान औरंगाबाद शहर बॉक्सिंग संघटनेचे प्रतिनिधित्व करताना रायगड येथील राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना रोहतक येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातील आपली निवड पक्की केली होती. याआधी तिने गुवाहाटी येथे गतवर्षी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. विशेष म्हणजे अवघ्या २ वर्षांतच शर्वरी कल्याणकर हिने राज्य व राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक जिंकण्यापर्यंत मजल मारली आहे. या यशाबद्दल तिचे साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर व शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांनी अभिनंदन केले.


खांद्याला दुखापत होती. तरीही चांगला सराव केला असल्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची जिद्द होती. रोहतक येथील गोल्डन कामगिरीने आत्मविश्वास उंचावला असून, दुबई येथील ज्युनिअर आशियाई स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावून खेळू. भारताची दिग्गज खेळाडू मेरी कोम ही माझी आदर्श असून माझे मुख्य धेय हे देशासाठी आॅलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचे आहे.
-शर्वरी कल्याणकर

शर्वरी कल्याणकर ही मेहनती खेळाडू असून तिचे भवितव्य उज्ज्वल आहे. तिच्यात इच्छाशक्ती तीव्र आहे. तिला तिच्या पालकांचाही चांगला पाठिंबा आहे. ती राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावील, असा विश्वास होता. यासाठी तिने गत महिन्यात खूप कसून सराव केला. दुबई येथील आशियाई स्पर्धेतही ती निश्चितच चांगली कामगिरी करील, असा विश्वास आहे.
- सनी गेहलावत (प्रशिक्षक)

शर्वरी कल्याणकर ही औरंगाबादची प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडू आहे. अवघ्या काही वर्षांतच तिने ही देदीप्यमान कामगिरी केली आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकून ज्युनिअर आशियाई स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवणे ही मराठवाड्यासाठी भूषणावह बाब आहे. या कामगिरीमुळे शर्वरीचा आदर्श घेऊन आणखी दर्जेदार खेळाडू शहरातून पुढे येतील. आवश्यकता पडल्यास संघटनेतर्फे तिला आर्थिक पाठबळही दिले जाईल.
-पंकज भारसाखळे,
सचिव, शहर बॉक्सिंग संघटना

Web Title: Sharwari in the Indian boxing team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.