चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे म्हणून विका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:05 AM2021-04-12T04:05:07+5:302021-04-12T04:05:07+5:30

सिल्लोड : तालुक्यातील गेवराई सेमी येथे कृषी विभागामार्फत बिजोत्पादन मोहीम राबविण्यात आली. यावेळी सोयाबीन बियाणे राखून ठेवलेल्या शेतकऱ्यांनी ...

Sell good quality soybean seeds | चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे म्हणून विका

चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे म्हणून विका

googlenewsNext

सिल्लोड : तालुक्यातील गेवराई सेमी येथे कृषी विभागामार्फत बिजोत्पादन मोहीम राबविण्यात आली. यावेळी सोयाबीन बियाणे राखून ठेवलेल्या शेतकऱ्यांनी बाजार भाव वाढल्याने आपले सोयाबीन व्यापाऱ्यांना विकण्यापेक्षा आपल्या गावातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बियाणे म्हणून विकावे. तसेच हे करताना आपल्याकडील शिल्लक बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घ्या, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी केले.

बियाण्यांची उगवण क्षमता तपासताना बियाण्यांमधून शंभर बिया घ्या. यानंतर एक पोतं ओलं करुन त्यावर दहा बाय दहाच्या रांगा करुन बियाणे टाकून नंतर गुंडाळी करुन ठेवा. चार ते पाच दिवसांत उघडून किती बियाणे उगविली याचे निरीक्षण करावे. जर ७० बियाण्यांच्या वर बियाणे उगवली असतील तर एकरी ३० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे, असे सांगून दीपक गवळी यांनी प्रात्यक्षिक करुन दाखविले. मंडळ कृषी अधिकारी प्रमोद डापके यांनी बीज प्रक्रिया कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी कृषी सहाय्यक सारिका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कृषी मित्र बाबूराव ताठे, चेअरमन दादाराव ताठे, सोमीनाथ ताठे, योगेश ताठे, दत्तू ताठे, कडूबा ताठे आदींची यावेळी उपस्थिती होती.

फोटो कॅप्शन : गेवराई सेमी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी, कृषी सहाय्यक सारिका पाटील, बाबूराव ताठे, दादाराव ताठे, सोमीनाथ ताठे आदी.

110421\img_20210411_180155_124_1.jpg

गेवराई सेमी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी, कृषी सहाय्यक सारिका पाटील, बाबूराव ताठे, दादाराव ताठे, सोमीनाथ ताठे आदी.

Web Title: Sell good quality soybean seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.