निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचा २० रोजी भव्य कीर्तन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:33 IST2017-11-18T23:33:30+5:302017-11-18T23:33:36+5:30
लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या अभीष्टचिंतन दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी २० रोजी हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या भव्य हरिकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा कीर्तन सोहळा गारखेडाच्या पूर्व बाजूस कालिकामाता मंदिराशेजारी असलेल्या कारगिल मैदानावर होणार आहे.

निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचा २० रोजी भव्य कीर्तन सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या अभीष्टचिंतन दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी २० रोजी हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या भव्य हरिकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा कीर्तन सोहळा गारखेडाच्या पूर्व बाजूस कालिकामाता मंदिराशेजारी असलेल्या कारगिल मैदानावर होणार आहे.
राजेंद्र दर्डा यांच्या अभीष्टचिंतन दिनानिमित्त मागील १९ वर्षांपासून झुंजार वैष्णव वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबन डिडोरे पाटील यांचे सर्व सहकारी मित्रमंडळ, भोलेश्वर भजनी मंडळ, भोलेश्वर गणेश मंडळाच्या वतीने हभप निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन आयोजित केले जात आहे. यंदा कारगिल मैदानावर सायंकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेदरम्यान कीर्तन सोहळा होणार आहे. कीर्तन सोहळ्याच्या एक तास अगोदर हभप प्रभाकर कुटे महाराज (बीड) यांच्या भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. हरिकीर्तन सोहळ्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन बबन डिडोरे पाटील, राजाराम मोरे, पंजाबराव तौर, काशीनाथ जाधव, रमेश दिसागज, भिकनराव मात्रे, वामनराव ओळेकर, निवृत्ती कोंडके, ज्ञानेश्वर साठे, अनिल खंबाट, रघुनाथ हिवाळे यांनी केले आहे.