Neha Kakkar was relieved to hear the struggle of the contestant | स्पर्धकाची स्ट्रगल ऐकून हळवी झाली नेहा कक्कर

स्पर्धकाची स्ट्रगल ऐकून हळवी झाली नेहा कक्कर

देशातील टॉप गायिकांमधील नेहा कक्करने तिच्या लाइफमध्ये खूप स्ट्रगल केला आहे. एकेकाळी ती जागरणात गात होती. आपल्या आवाजासोबतच नेहा तिच्या हळव्या मनासाठीही ओळखली जाते. याची झलक पुन्हा एकदा ‘इंडियन आयडॉल १२’च्या सेटवर बघायला मिळाली. नेहा स्पर्धक शहजाद अलीची कहाणी ऐकून फारच इमोशनल झाली आहे. शहजाद हा जयपूरहून आला आहे. शहजादच्या कहाणीमुळे नेहा इतकी प्रभावित होते की, तिने त्याला १ लाख रूपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. तसेच जज विशाल दादलानी यानेही शहजादला मदत करण्याचा निर्णय घेतला.

गंगाने केली टीकाकारांची बोलती बंद

‘तू बायल्या, फक्त साडी घालण्याच्या लायकीचा’ अशा बऱ्याच कमेंट्स आणि टीकांना सामोरे जात अनेकांची बोलती बंद करत आज कारभारी लयभारी मालिकेतील गंगाने छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. फार कमी लोकांना माहित असेल की गंगा मराठीसृष्टीला मिळालेला पहिलावहिला ट्रान्सजेंडर चेहरा आहे. गंगाचे खरे नाव प्रणित हाटे असून अपार मेहनत, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर त्यास हे यश मिळाले आहे. गंगा या मालिकेतील राजवीर, प्रियंका, शोना यांच्या भूमिकेसोबत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे.

Web Title: Neha Kakkar was relieved to hear the struggle of the contestant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.