नारीशक्ती ग्रामपंचायत गाजवणार; सोयगाव तालुक्यात ३६४ पैकी २३४ जागांवर महिला सदस्यांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 03:27 PM2021-01-22T15:27:18+5:302021-01-22T15:27:47+5:30

सोयगाव तालुक्यात चाळीस पैकी ३६ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या

Narishakti Gram Panchayat to be formed; In Soygaon taluka, out of 364, 234 are female members | नारीशक्ती ग्रामपंचायत गाजवणार; सोयगाव तालुक्यात ३६४ पैकी २३४ जागांवर महिला सदस्यांचा बोलबाला

नारीशक्ती ग्रामपंचायत गाजवणार; सोयगाव तालुक्यात ३६४ पैकी २३४ जागांवर महिला सदस्यांचा बोलबाला

googlenewsNext
ठळक मुद्दे तालुक्यात चार बिनविरोध ग्राम पंचायती निवडून आल्या

सोयगाव : चार बिनविरोध ग्रामपंचायतीसह सोयगाव तालुक्यात चाळीस ग्रामपंचायतीसाठी निवडणूक  झाली. यात एकूण ३६४ सदस्य निवडून आले. या सदस्यांपैकी २३४ महिला सदस्य निवडून आल्याने तालुक्यातील ग्राम पंचायती नारीशक्ती गाजवणार असल्याचे चित्र आहे. 

सोयगाव तालुक्यात चाळीस पैकी ३६ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या यामध्ये २३४ जागांवर महिला सदस्यांची वर्णी लागली आहे.  मात्र, राखीव प्रवर्गासाठी महिला सदस्यांची कमी असल्याने त्या गावांमध्ये सरपंच पदाची अडचण निर्माण व्होऊ शकते. अनुसूचित जातीसाठी केवळ सात जागांवर महिला सदस्य, अनुसूचित जमातीसाठी-२३, नागरिकांचा मागास प्रवर्ग-४७ आणि सर्वसाधारणसाठी-१२३ महिला सदस्य निवडून आले आहेत. मोठ्या प्रमाणात महिलांनी बाजी मारल्याने तालुक्यातील निम्म्या ग्राम पंचायातींवर महिलांच्या हाती गाव कारभाराची दोरी असणार आहे.

Web Title: Narishakti Gram Panchayat to be formed; In Soygaon taluka, out of 364, 234 are female members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.