लाल रंगात रंगलेला ‘महा रन’; लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल रेड रनला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 01:00 AM2020-09-08T01:00:57+5:302020-09-08T01:01:02+5:30

उत्साह आणि ऊर्जा

‘Maha Run’ painted in red; Spontaneous response to the Lokmat Mahamarathon Virtual Red Run | लाल रंगात रंगलेला ‘महा रन’; लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल रेड रनला उत्स्फूर्त प्रतिसाद

लाल रंगात रंगलेला ‘महा रन’; लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल रेड रनला उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext

औरंगाबाद : लोकमत मीडियातर्फे रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल रेड रनला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनामुळे धावपटू मोठ्या संख्येने एकत्र येऊ शकले नाहीत, तरीही लोकमत मीडियाने व्हर्च्युअल रनच्या आयोजनात दाखविलेल्या कल्पकतेमुळे धावपटू एकमेकांशी जोडले गेले आणि जणू एकत्रच धावतो आहोत, असा अनुभव त्यांना येत होता.

धावण्याचे महत्त्व पटवून देणे आणि निरोगी जीवनशैलीच्या मार्गावर चालून आनंद मिळवणे या मुख्य उद्देशाने लोकमत मीडियातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. व्हर्च्युअल रेड रनअंतर्गत सर्व धावपटूंना आवड, ऊर्जा, आत्मविश्वास आणि धैर्य यांचे प्रतीक असलेल्या लाल रंगाच्या वेशभूषेत धावताना पाहणे आनंददायी ठरले.

लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल रनमध्ये नेहमीच तज्ज्ञांचा सहभाग असतो. यावेळीही फिटनेस तज्ज्ञ तथा हार्ट आणि ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. आनंद देवधर, अल्ट्रा मॅरेथॉन रनर तसेच सलग १० कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन धावणारे सतीश गुजरान यांनी धावपटूंना वेबिनारद्वारे मार्गदर्शन केले. निरोगी हृदयासाठी धावणे किती महत्त्वाचे आहे, हे समजावले. ज्यांना तज्ज्ञांचे हे मार्गदर्शन ऐकायचे आहे, ते लोकमत महामॅरेथॉन फेसबुक पेजला भेट देऊन वेबिनार ऐकू शकतात.

धावपटूंची सकारात्मकता ऊर्जा देणारी

महामॅरेथॉन रनर्सच्या लाल रंगाने रंगून गेलेले फेसबुक पाहणे अत्यंत रंजक ठरले. स्पर्धेत सहभागी झालेले आपले सर्व धावपटू अतिशय सकारात्मक मार्गाने त्यांच्या जीवनाकडे पाहत आहेत, हे माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी होते. व्हर्च्युअल रेड रनच्या रविवारची सकाळ अतिशय धमाकेदार ठरली. प्रत्येक सकाळ महासकाळ करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या प्रत्येकाचे आभार.
- रुचिरा दर्डा, संस्थापिका, लोकमत महामॅरेथॉन

लाल रंग हा सर्वात प्रभावी रंग मानला जातो. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ऊर्जा देण्याचे काम लाल रंग करतो. सध्याच्या काळात हेच तर सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. लोकमत व्हर्च्युअल रनची वाढणारी लोकप्रियता कौतुकास्पद आहे. १२ हजारांपेक्षाही जास्त लोक नक्कीच रेड रनमध्ये धावले असणार, असा मला विश्वास वाटतो.
- संजय पाटील, रेस डायरेक्टर, लोकमत महामॅरेथॉन

मी २००४ पासून विविध स्पर्धांमध्ये धावत आहे. या १६ वर्षांत मी एवढेच शिकलो आहे की, आयुष्यात जर तुम्हाला प्रेरणा मिळवायची असेल, तर एक ध्येय समोर ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळेच लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल रेड रन हे एक छोटे ध्येयही धावपटूंना निश्चितच प्रेरणा देऊन जाईल. लोकमत नेहमीच महामॅरेथॉन आयोजित करीत असते; पण सध्या कोविड काळातही त्यांनी व्हर्च्युअल रनच्या माध्यमातून या उपक्रमात ठेवलेले सातत्य कौतुकास्पद
आहे.
- सतीश गुजरान, अल्ट्रा रनर, मुंबई

ऑनलाईन वॉर्मअपने रेड रनची सुरुवात

1. उपक्रमाची सुरुवात रिलॅक्स झील यांच्या वतीने प्रीती भानुशाली यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या अतिशय उत्साहवर्धक वॉर्मअपने झाली.
2. धावपटूंसाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या या वॉर्मअपनंतर लोकमत सखी मंच संस्थापिका आशू दर्डा, लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापिका रुचिरा दर्डा, रेस डायरेक्टर संजय पाटील, डॉ. आनंद देवधर, सतीश गुजरान आणि पुणे येथील एसकेपी स्पोटर््सचे संचालक सागर बालवाडकर यांनी ध्वज दाखवून स्पर्धेची सुरुवात केली.
3. रेड रन झाल्यानंतर डीजे टोची
यांच्या रॉकबॅण्डने दर्जेदार सादरीकरण करून धावपटूंचे मनोरंजन केले.

Web Title: ‘Maha Run’ painted in red; Spontaneous response to the Lokmat Mahamarathon Virtual Red Run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.