शॉर्टसर्किटमुळे दोन शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:05 AM2021-04-12T04:05:02+5:302021-04-12T04:05:02+5:30

शेकटा : शेतातून जाणाऱ्या विद्युत तारांचा स्पर्श होऊन पडलेल्या आगीच्या ठिणगीने दोन शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनाचे साहित्य जळून खाक झाले ...

Loss of two farmers due to short circuit | शॉर्टसर्किटमुळे दोन शेतकऱ्यांचे नुकसान

शॉर्टसर्किटमुळे दोन शेतकऱ्यांचे नुकसान

googlenewsNext

शेकटा : शेतातून जाणाऱ्या विद्युत तारांचा स्पर्श होऊन पडलेल्या आगीच्या ठिणगीने दोन शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनाचे साहित्य जळून खाक झाले आहे. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे मदतीची मागणी केली आहे.

देमणी (वाहेगाव) शिवारातील गटनंबर ८९ व ९१ या गटातून ‘महावितरण’च्या तारा गेल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी तारांचा स्पर्श झाल्याने आगीच्या ठिणग्या पडल्या. हवेमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळ‌ेे शेतकरी मच्छिंद्र वाघ यांच्या शेतातील जमा केलेले ठिबक सिंचनाचे पाईप, पीव्हीसी पाईप व फिल्टर जळून खाक झाले तर ओमीद शेख या दुसऱ्या शेतकऱ्याचे देखील यात नुकसान झाले आहे. शेख यांच्या शेतातील ठिबक, पाईपलाईनचे पीव्हीसी पाईप, फिल्टर, मोटर स्टार्टर, केबल व जनावरांचा चारादेखील जळून खाक झाला आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

फोटो : शॉर्टसर्किटमुळे ठिबक व पीव्हीसी पाईप जळ‌ून खाक

110421\img-20210409-wa0130_1.jpg

शेकटा येथील पाईपचे झालेले नुकसान

Web Title: Loss of two farmers due to short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.