वडार समाजाचा एसटीत समावेश करा, गोलमेज परिषदेतील मागणी

By | Published: December 2, 2020 04:12 AM2020-12-02T04:12:43+5:302020-12-02T04:12:43+5:30

‌ वडार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व ''वडार समाज: परंपरा व इतिहास'' या ग्रंथाचे लेखक टी. एस. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ...

Include the Vadar community in the ST, the demand in the Round Table Conference | वडार समाजाचा एसटीत समावेश करा, गोलमेज परिषदेतील मागणी

वडार समाजाचा एसटीत समावेश करा, गोलमेज परिषदेतील मागणी

googlenewsNext

‌ वडार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व ''वडार समाज: परंपरा व इतिहास'' या ग्रंथाचे लेखक टी. एस. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली. ज्येष्ठ विधिज्ञ व सत्यशोधक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. आर. शेळके यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

वडार समाज साहित्य परिषदेच्या वतीने जयभवानी नगरात झालेल्या या परिषदेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वडार समाजाचे प्रमुख कार्यकर्ते, साहित्यिक व अधिकारी उपस्थित होते. यावेळी एकूण १२ मागण्यांवर चर्चा झाली. पुढची परिषद कोल्हापूर येथे जानेवारीत होईल.

पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात इ. राज्यात वडार समाज एस.टी.त आहे. तर कर्नाटकात ए.सी.मध्ये आहे. महाराष्ट्रात विमुक्त जाती अ मध्ये आहे. पण याचे लाभ मिळत नसल्याची खंत यावेळी शेळके व चव्हाण यांनी व्यक्त केली. वडार समाजाने फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा अंगीकारावी असा सल्ला शेळके यांनी दिला.

दिपेश पिटेकर यांनी प्रास्ताविक केले. रोहिदास कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले. मच्छिंद्र धनवटे यांनी आभार मानले.

दयानंद इरकल (पुणे), मनोहर मुधोळकर(सोलापूर), हरिश बंडीवडार (पुणे), अशोक पवार (पुणे), दुर्गादास गुडे (औरंगाबाद) आदींची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. दुसऱ्या सत्रात आलेल्या सर्व प्रतिनिधींनी मनोगते व्यक्त केली. कृती समिती व मसुदा समितीही या परिषदेत स्थापन करण्यात आली.

Web Title: Include the Vadar community in the ST, the demand in the Round Table Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.