जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

By | Published: December 2, 2020 04:12 AM2020-12-02T04:12:40+5:302020-12-02T04:12:40+5:30

औरंगाबाद : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ३ डिसेंबर रोजी एसपीज अर्ली इन्टरव्हेंशन सेंटर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात ...

Health check-up camp on the occasion of World Disability Day | जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

googlenewsNext

औरंगाबाद : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ३ डिसेंबर रोजी एसपीज अर्ली इन्टरव्हेंशन सेंटर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.

शहरात प्रथमच एकाच छताखाली १ वर्षापासून एसपीज अर्ली इन्टरव्हेंशन सेंटर येथे श्रवणदोष तज्ज्ञ, वाचा व भाषा उपचार तज्ज्ञ, फिजिओथेरपी, सायकॉलॉजिस्ट अशा तज्ज्ञांकडून वेगवेगळ्या आजारांवर निदान करून उपचार केले जात आहेत. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ३ रोजी शिबिरात तज्ज्ञांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे. ऐकू कमी येणे, कॉकलियार इम्प्लांटविषयी मार्गदर्शन, बोबडेपणा, पॅरालिसिसमुळे बोलण्यात अडचण. प्रौढांमध्ये मानदुखी, खांदादुखी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघ्याच्या त्रासामुळे बसण्यात व चालण्यात अडचण. तसेच सायकॉलॉजी विभागांतर्गत अतिचंचलता, स्वमग्नता यावर मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे. गरजूंनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेंटरचे संचालक श्री पंकज शिंदे व शाहिद शेख यांनी केले आहे.

Web Title: Health check-up camp on the occasion of World Disability Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.