पहिलेच अपत्य, पण मुलगा की मुलगी अजूनही कळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 12:49 PM2021-10-04T12:49:24+5:302021-10-04T12:53:56+5:30

Complications in New born child : आई-वडिलांसह घाटीतील डाॅक्टरांना तपासणी अहवालाची प्रतीक्षा 

The first child, but the boy or girl still did not know! | पहिलेच अपत्य, पण मुलगा की मुलगी अजूनही कळेना !

पहिलेच अपत्य, पण मुलगा की मुलगी अजूनही कळेना !

googlenewsNext
ठळक मुद्दे घाटीत प्रसूती झाली मात्र अपत्यात जन्मजात गुंतागुंत  जेनेटिक तपासणीसाठी सामाजिक संस्थेची आर्थिक मदत

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : लग्नानंतर दोन वर्षांनी बाळाच्या येण्याची चाहूल लागली. पाहता पाहता गरोदरपणाची ९ महिनेही पूर्ण झाले. घाटी रुग्णालयात सिझेरियन प्रसूती झाली आणि नवजात शिशूच्या आगमनाने कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना झाला. हा आनंद काही वेळेतच चिंतेत बदलला. कारण शिशूमधील जन्मजात गुंतागुंतीच्या स्थितीने मुलगा की मुलगी, हे डाॅक्टरांनाही सांगणे अशक्य झाले. अखेर जेनेटिक तपासणीच्या अहवालानंतरच मुलगा की मुलगी, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आई-वडिलांसह घाटीतील डाॅक्टरांचे जेनेटिक तपासणीच्या अहवालाकडे डोळे लागले आहेत. ( The first child, but the boy or girl still did not know!) 

शहरात राहणारे हे दाम्पत्य कंपनीत काम करून उदरनिर्वाह करते. शिशूच्या जेनेटिक तपासणीसाठी आवश्यक ५ हजार रुपयांची रक्कमही त्यांच्याकडे नव्हती. तपासणीविनाच ते बाळाला घेऊन घाटीतून रवाना होत होते. ही बाब घाटीतील डाॅक्टर, परिचारिकांना कळली. त्यांनी सामाजिक संस्थेला ही बाब कळविली. के. के. ग्रुपचे अध्यक्ष अखिल अहमद, उपाध्यक्ष किशोर वाघमारे, सचिव शेख जुनेद, मोहम्मद आसिफ, आसिफ खान यांनी आर्थिक मदत केली. त्यानंतर शहरातील एका लॅबच्या माध्यमातून कॅरिओटायपिंग टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल मुंबई येथून दोन ते तीन दिवसांत प्राप्त होणार आहे.

जुना वाद उफाळून आला; रिक्षा चालकाचा तिघांनी खून केला

आर्थिक मदतीची गरज
नवजात शिशूला आणि मातेला घाटीतील प्रसूती विभागातून सुटी देण्यात आली आहे. प्रसूती विभागातून जाताना मुलगा झाला...मुलगी झाली...असा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो. परंतु या दाम्पत्याला त्यासाठी वाट पाहावी लागत आहे. शिशूचे वडील ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, मुलगा असो की मुलगी, असा विचार करण्याऐवजी त्याची अधिक काळजी घेत आहोत. पण मुलगा, मुलगी निदान झाल्यानंतर पुढील उपचारासाठी आर्थिक प्रश्न उभा राहू शकतो, असे म्हणाले.

अशा शिशूंचे प्रमाण कमी
प्रसूतीनंतर मुलगा की मुलगी कळत नव्हते. त्यामुळे कॅरिओटायपिंग टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल लवकरच येईल. दाम्पत्याला फाॅलोअपसाठी बोलावले आहे. गर्भात बाळ तयार होताना असे प्रकार काही प्रमाणात होत असतात.
- डाॅ. सोनाली देशपांडे, प्रसूतीशास्त्र विभाग, घाटी

Web Title: The first child, but the boy or girl still did not know!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.