सोशल मीडियातून पदवीधर निवडणूक प्रचाराचा धुराळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 01:05 PM2020-11-21T13:05:25+5:302020-11-21T13:06:20+5:30

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहितेत सोशल मीडियासाठी जे निकष लावण्यात आले होते, तेच निकष या निवडणुकीसाठी देखील आहेत.

The dust of the graduate election campaign from social media | सोशल मीडियातून पदवीधर निवडणूक प्रचाराचा धुराळा

सोशल मीडियातून पदवीधर निवडणूक प्रचाराचा धुराळा

googlenewsNext
ठळक मुद्दे व्हायरल पोस्टमधून आचारसंहितेचे उल्लंघन करणारा प्रचार मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या कुरुक्षेत्रात ३५ उमेदवार

औरंगाबाद : सोशल मीडियातून (समाज माध्यम) मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचाराचा धुराळा उडतो आहे. हा प्रचार सर्व उमेदवारांच्या समर्थकांमार्फत केला जात असून, त्यात आचारसंहितेचे नियम पाळले जात आहेत की नाहीत, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहितेत सोशल मीडियासाठी जे निकष लावण्यात आले होते, तेच निकष या निवडणुकीसाठी देखील आहेत. असे असताना एक्झिट पोल घेणे, उमेदवारांच्या पोस्टवर टीका करणे, कोण होणार आमदार, म्हणून सर्व्हे करण्याचे प्रकार समोर येत आहेत. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजांनी केलेल्या पोस्ट व्हायरल होऊन त्यातूनही आचारसंहितेचे उल्लंघन करणारा प्रचार होताना दिसतो आहे.  
यावर सोशल मीडियावर अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखालील समिती दुर्लक्ष करीत असल्याचे सध्या तरी दिसते आहे. सोशल मीडियातील प्रचाराबाबत तक्रार आली तरच समिती दखल घेऊन कारवाई करते, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. अद्याप सोशल मीडियातील प्रसाराबाबत एकही तक्रार आली नसल्याचेही समितीच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या कुरुक्षेत्रात ३५ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. औरंगाबादमधील १४ उमेदवार, बीड जिल्ह्यातील ८, तर उर्वरित १३ उमेदवार पुणे, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील आहेत. यंदाच्या निवडणुकीत विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून उमेदवार मैदानात आहेत. सर्वाधिक उमेदवार औरंगाबाद जिल्ह्यातील असून त्याखाली बीड जिल्ह्यांतून उमेदवार आहेत. असे असले तरी खरी लढत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये होत आहे. प्रमुख उमेदवार प्रत्यक्ष प्रचारासह सोशल मीडियातही अग्रेसर आहेत. समर्थकांच्या माध्यमातून विविध पोस्ट, मजकूर, छायाचित्रे सोशल मीडियात फॉरवर्ड केली जात आहेत. त्याशिवाय इतरही उमेदवारांचा सोशल मीडियातून प्रचार सुरू आहे. 

निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती अशी 
या निवडणुकीचे निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, या निवडणुकीत सोशल मीडियासाठी आचारसंहितेचे काय नियम आहेत, ते बघावे लागेल.

मराठवाड्यात ३५ उमेदवारांत लढत
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या कुरुक्षेत्रात ३५ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. औरंगाबादमधील १४ उमेदवार, बीड ८, तर उर्वरित १३ उमेदवार पुणे, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील आहेत. यंदा प्रत्येक जिल्ह्यातून उमेदवार मैदानात आहेत. सर्वाधिक उमेदवार औरंगाबाद जिल्ह्यातील असून त्याखाली बीड जिल्ह्यांतून उमेदवार आहेत. असे असले तरी खरी लढत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये होत आहे. प्रत्येक उमेदवाराचा सोशल मीडियातून प्रचार सुरू आहे. 

Web Title: The dust of the graduate election campaign from social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.