CoronaVirus : सोयगाव शहरासह तालुक्यात संपूर्ण टाळेबंद;ग्रामीण भागात प्रवेशबंदचे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 04:33 PM2020-04-21T16:33:29+5:302020-04-21T16:36:42+5:30

ग्रामीण भागात गावाचे मुख्य रस्ते बंद करून ग्रामस्थांनी चक्क रस्त्यावर प्रवेशबंदीचे सूचना फलक उभारून गावात प्रवेश केल्यास 500 रु दंड देण्यात येणार असल्याचे सूचनेत नमूद करण्यात आले होते.

CoronaVirus: Complete lockout in the Soygaon city and taluka | CoronaVirus : सोयगाव शहरासह तालुक्यात संपूर्ण टाळेबंद;ग्रामीण भागात प्रवेशबंदचे फलक

CoronaVirus : सोयगाव शहरासह तालुक्यात संपूर्ण टाळेबंद;ग्रामीण भागात प्रवेशबंदचे फलक

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमीबहुलखेडा गावात २१०० रुपये रंग

सोयगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सोयगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळला. यामुळे प्रशासनाने घोषित करण्यात आलेला टाळेबंद शंभर टक्के यशस्वी झााला.

ग्रामीण भागात गावाचे मुख्य रस्ते बंद करून ग्रामस्थांनी चक्क रस्त्यावर प्रवेशबंदीचे सूचना फलक उभारून गावात प्रवेश केल्यास 500 रु दंड देण्यात येणार असल्याचे सूचनेत नमूद करण्यात आले होते.त्यामुळे ग्रामीण ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागही शंभर टक्के सीलबंद झाला होता.

सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी पोलीस पथकांसह तालुकाभर जनजागृती करून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले.तहसीलदार प्रवीण पांडे यांनीही शहरवासीयांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जरंडी,माळेगाव,पिंपरी,बहुलखेडा,कवली,निंबायती,रामपूरतांडा,घोसला,नांदगाव,तिडका,वरठाण,गोंदेगाव,आणि बनोटी आदी भागातही बंद शंभर टक्के पाळण्यात आला होता.तहसीलदार प्रवीण पांडे,पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,नायब तहसीलदार मकसूद शेख,सतीश देशमुख,विठ्ठल जाधव आदींनी टाळेबंद दरम्यान शहरातील रस्त्यांची पाहणी केली.

तोकड्या पोलीस कर्मचाऱ्यांवर लॉकडाऊन
महिनाभरापासून सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या लॉक डाऊन सोयगाव सह ५१ गावांसाठी केवळ एका पोलीस निरीक्षक आणि ३३ पोलीस कर्मचाऱ्यांवर ५१ गावांचा बंदोबस्त अवलंबून असल्याने मंगळवारच्या लॉकडाऊनसाठी पोलिसांना कमालीची कसरत करावी लागली होती.

बहुलखेडा गावाने ठरवलंय २१०० रु दंड
सोयगाव-चाळीसगाव रस्त्यावरील मुख्य रस्त्यावर असलेल्या बहुलखेडा ता.सोयगाव या गावाने गावात परजिल्ह्यातील आणि गावाजवळील व्यक्तीने प्रवेश केल्यास २१०० रु दंड ठोठावला आहे.त्यामुळे बहुलखेड्यापासून बनोटीकडे जाणारा रस्ताही सुमसाम झाला आहे.

Web Title: CoronaVirus: Complete lockout in the Soygaon city and taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.