रेल्वेखाली आलेला चिमुकला बाल-बाल बचावला
By Admin | Updated: July 8, 2017 14:56 IST2017-07-08T14:56:51+5:302017-07-08T14:56:51+5:30
धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात तीन वर्षीय चिमुकला अचानक दरवाज्यातून बाहेर फेकल्या गेल्यानंतर रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये सापडला.

रेल्वेखाली आलेला चिमुकला बाल-बाल बचावला
संतोष हिरेमठ/ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर शनिवरी(दि.८) सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून मनमाड-काचिगुडा पॅसेंजर रवाना होत असताना एकाच वेळी अनेकांच्या तोंडातून किंचाळ्या फुटल्या. धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात तीन वर्षीय चिमुकला अचानक दरवाज्यातून बाहेर फेकल्या गेल्यानंतर रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये सापडला.
अशा घटनेत कोणी वाचेल, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु नशीब बलवत्तर म्हणून या घटनेत हा चिमुकला बाल-बाल बचावला. वेळीच रेल्वे थांबविल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविणारी ठरली. मोठ्या दुर्घटनेपासून चिमुकला बचावल्याने कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला. घटनेनंतर ते पुढील प्रवासाला रवाना झाले. रेल्वेस्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेºयात ही घटना टिपली गेली. ती पाहिल्यानंतर या घटनेची तीव्रता स्पष्ट होते.