आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवांच्या विस्ताराने औरंगाबाद बनतेय मेडिकल हब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 07:09 PM2019-11-29T19:09:36+5:302019-11-29T19:12:17+5:30

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणाऱ्या उपचार पद्धतीमुळे जिल्ह्यासह मराठवाड्यातील रुग्णांना दिलासा

Aurangabad is becoming a Medical Hub with the expansion of modern technology and services | आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवांच्या विस्ताराने औरंगाबाद बनतेय मेडिकल हब

आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवांच्या विस्ताराने औरंगाबाद बनतेय मेडिकल हब

googlenewsNext
ठळक मुद्दे४५८ खाजगी रुग्णालये ८,८१२ खाटामुंबई, पुण्याच्या धर्तीवर कॉर्पोरेट रुग्णालये

औरंगाबाद : शहरातील वैद्यकीय सेवेचा गेल्या काही वर्षांत विस्तार झाला असून, खाजगी रुग्णालयांची संख्या ४५८ वर गेली आहे. गेल्या ४ वर्षांत ७७ नवीन रुग्णालये सुरू झाली आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणाऱ्या उपचार पद्धतीमुळे जिल्ह्यासह मराठवाड्यातील रुग्णांना पुणे, मुंबईला जाण्याची गरज राहिलेली नाही. औरंगाबाद हे आता मेडिकल हब म्हणून उदयास येत आहे. 

शहराची लोकसंख्या १६ लाखांच्या वर गेली आहे. शासकीय रुग्णालयांबरोबर खाजगी रुग्णालयांवरही नागरिकांचे आरोग्य अवलंबून आहे. आरोग्यसेवा ही मूलभूत गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही ‘आरोग्य’ हा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे; परंतु ही मूलभूत गरज भागविण्यासाठी आणि अधिकार मिळविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शहरात छावणी रुग्णालय आहे, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आहे. आता जिल्हा सामान्य रुग्णालयदेखील सुरू झाले आहे. महापालिकेची ३४ आरोग्य केंद्रे आहेत. या सगळ्यातही खाजगी रुग्णांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. प्रत्येक वर्षी नव्या रुग्णालयाची भर पडत आहे.

शहरातील जालना रोडलगत गेल्या काही वर्षांत खाजगी रुग्णालयांची संख्या वाढली आहे. चिकलठाणा ते भगवान महावीर चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा खाजगी रुग्णालये उभी राहिली आहेत. जालना रोडपाठोपाठ बीड बायपासवरदेखील ठिकठिकाणी नवीन रुग्णालये सुरू झाली आहेत. मुंबईसह अन्य शहरांमध्ये असलेल्या रुग्णालयांच्या शाखाही औरंगाबादेत सुरू करण्यास प्राधान्य दिले जात आहे. प्रसूतिशास्त्र, अस्थिव्यंगोपचारासह हृदयविकार, मूत्रपिंडविकार, मेंदुविकार, पोटाचे विकार यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालये कार्यान्वित झाली आहेत. 

८ महिन्यांत १९ नवीन रुग्णालये
शहरात यावर्षी एप्रिलपासून आतापर्यंत म्हणजे अवघ्या ८ महिन्यांत १९ नवीन रुग्णालये सुरू झाली आहेत. शहरातील सध्या कार्यरत असलेल्या एकूण खाजगी रुग्णालयांची संख्या ४५८ इतकी झाली आहे. या सर्व खाजगी रुग्णालयांतील एकूण खाटांची संख्या ८ हजार ८१२ इतकी आहे. म्हणजे एवढे रुग्ण खाजगी रुग्णालयांत दाखल असतात. केवळ बाह्यरुग्णसेवा देणारी रुग्णालये आणि लॅबची संख्या १,७०० च्या घरात आहे.

नवीन रुग्णालयांची नोंद
वर्ष        संख्या
२०१६-१७        ४
२०१७-१८        ३७
२०१८-१९        १७
२०१९-२०(आजपर्यंत)    १९
एकूण        ७७

योग्य शुल्कात उपचार मिळावेत
शहरात दरवर्षी नवीन रुग्णालये सुरू होत आहेत. मराठवाड्यातून लोक उपचारासाठी शहरात येतात. रुग्णालयांमध्ये योग्य पद्धतीने उपचार मिळावेत. सर्वसामान्य रुग्णांना योग्य शुल्कात उपचार मिळाले पाहिजे.               
-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

Web Title: Aurangabad is becoming a Medical Hub with the expansion of modern technology and services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.