कोरोनामुळे देशात केलेल्या लॉकडाऊनमुळे शेतमालाला मातीमोल भाव मिळाला. यामुळे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी अडचणीत आले असताना आता पुन्हा लॉकडाऊनच्या अफवा पसरत आहेत. अतिपावसाने नुकसान झाल्यानंतरही कसाबसा हाती आलेल्या शेतमालाचे यामुळे भाव पडतील व पुन्हा नुकसानीला सामोरे जावे लागेल, असे शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे लॉकडाऊन नको, तर नियमांचेच काटेकाेर पालन करु, असे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. सध्या भाव वाढेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. तसेच लॉकडाऊनच्या अफवेने परराज्यातून शेतकामांसाठी आलेल्या कामगारांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.
Web Title: Anxiety among farmers over fear of lockdown
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.