शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

खेलो इंडियातील गोल्डन गर्ल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 07:59 IST

वय वर्षे अवघी १५. पूर्व महाराष्ट्रातील आदिवासी भागातील मुलगी. वडील शेतमजूर. खेळासाठी वातारण तर नाहीच. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत महाराष्ट्राच्या ताई बामणे या मुलीने खेलो इंडियात ८०० मीटर मुलींच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. आज हीच मुलगी महाराष्ट्राची शान बनली आहे.

- सचिन कोरडेवय वर्षे अवघी १५. पूर्व महाराष्ट्रातील आदिवासी भागातील मुलगी. वडील शेतमजूर. खेळासाठी वातारण तर नाहीच. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत महाराष्ट्राच्या ताई बामणे या मुलीने खेलो इंडियात ८०० मीटर मुलींच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. आज हीच मुलगी महाराष्ट्राची शान बनली आहे. आता तिच्याकडे आॅलिम्पिकमधील भवितव्य म्हणून पाहिले जात आहे. ताई हिच्या सुसाट धावण्याचा गुण टिपला तो प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी.  विजेंदर सिंग जे गेल्या शुक्रवारी (दि. २) जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आत्मविश्वास आणि थोडसे बिथरलेले वाटत होते. ताई बामणे धावत होती. पोडियमपासून दूर उभे असलेले विजेंदर मात्र कुणाशी बोलत नव्हते. तिची शर्यत पूर्ण होईपर्यंत विजेंदरच्या नजरा केवळ ताईवरच होत्या. चेहºयावर खेळाडूंना उत्साहित करणा-या भावनाही ते आणत नव्हते. ताई जिंकणार असे त्यांना  वाटत होते. पण जिंकेपर्यंत त्याची देहबोली अत्यंत शांत होती. केरळची प्रिन्सीला डॅनियल आणि सँड्रा एएस या दोन्ही धावपटूंचे आव्हान ताईपुढे होते. ताईच्या तुलनेत या दोघींची देहरचना धष्टपुष्ट होती. त्यामुळे ती स्वत:ला कशी सिद्ध करणार, याची चिंताही त्यांना वाटत होती. ताई मात्र आत्मविश्वासाने ट्रॅकवर उतरली होती. ती बिनधास्त धावली. श्वास टिकवून ठेवत शेवटच्या क्षणी तिने सुवर्ण क्षणावर पाय ठेवला. तेव्हा कुठे विजेंदरच्या चेह-यावर हास्य फुलले. ८०० मीटरच्या शर्यतीसाठी २:१३:३७ अशी वेळ देत ताईने महाराष्ट्राला खेलो इंडियाया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. 

गेल्या अर्धदशकापासून विीजेंदर सिंग हे देशातील टॅलेंटचा शोेध घेत आहेत. देशात होणा-या मॅरेथॉन स्पर्धेवर ते नजर ठेऊन असायचे. त्यांनी कविता राऊत, संजीवनी जाधव, रणजित पटेल, किसन तडवी अशा खेळाडूंना मॅरेथॉन स्पर्धेतून निवडले आणि त्यांना मार्गदर्शन करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवले. ग्रासरूट पातळीवर खरे टॅलेंट असून त्याचा शोध घेण्याची गरज आहे, असे विजेंदर सांगतात. जेव्हा कविताला अर्जुन पुरस्कार मिळाला तेव्हापासून मला लोक द्रोणाचार्य संबोधतात. मी कधीही पुरस्काराचा विचार केला नाही पण जेव्हा माझे चॅम्पियन खेळाडू ट्रॅकवर धावतात तेव्हा खूप अभिमान वाटतो. विजेंदर हे मुझफ्फनगर (उत्तरप्रदेश) येथील असून ते सध्या नाशिक येथे राहतात.ते म्हणतात, नाशिक हे समुद्रसपाटीपासून ७०० मीटर उंच आहे. अशा वातावरण आणि स्थितीचा फायदा लांब पल्ल्याच्या धावपटूंना होतो. अंत्यत हालाखीच्या परिस्थितीतील धावपटूंना मात्र खूप संघर्ष करावा लागतो. काही मुली आजही रोज २० ते ३० लीटर पाणी डोक्यावर घेऊन चालतात. यातून १५ किमी अंतरराच्या चांगल्या धावपटू तयार होतात. मी यातून सकारात्मकपणे पाहतो आणि म्हणूनच आज माझ्याकडे महाराष्ट्रातील दुर्गम भागातील २० खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. आम्ही याकडे व्यावसायिकांचे लक्ष वेधले. काही डॉक्टरांची आम्हाला मदत मिळत आहेत. 

क्रॉस कंट्रीतून ताईचा शोध..

विजेंदर यांचीच शिष्य असलेल्या नाशिकच्या कविता राऊत हिने क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केली होती. त्यात दलपतपूर येथील ताई हिने बाजी मारली. शाळेतील स्पर्धेत तार्ईच पुढे असायची. पण मोठ्या पातळीवरील ती पहिल्यांदाच धावली होती.  त्यामुळे तिच्या शारीरिक शिक्षकांनी तिला नाशिक येथे प्रशिक्षणासाठी विजेंदर यांच्याकडे पाठवले. ताई ही कोणत्या शर्यतीत फिट बसेल हे आम्हाला आजही माहीत नाही. पण तिच्यातील आत्मविश्वास इतका प्रचंड आहे की ती स्पर्धा नक्की जिंकेल असे नेहमी वाटते. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर या मुलीने ८०० मीटरची शर्यत जिंकून ते सिद्ध करुन दाखवले. भविष्यात ही मुलगी आॅलिम्पिक स्पर्धेत चमक दाखवेल, असा विश्वास विजेंदर व्यक्त करतात. 

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र