शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

अर्ध मॅरेथॉनमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा नारा, पुरुषांमध्ये कोल्हापूरच्या दीपक कुंभारने सेनादलापुढे निर्माण केले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 4:45 PM

वरळी डेअर येथून पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी सुरु झालेल्या अर्ध मॅरेथॉनला धावपटूंचा तुफान प्रतिसाद मिळाला. थंड वातावरणामध्ये सुरु झालेल्या या शर्यतीमध्ये अव्वल धावपटूंनी अपेक्षित वर्चस्व राखले. महिला गटामध्ये संजीवनी जाधव आणि मोनिका आथरे या नाशिककरांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पटकावताना आपला दबदबा राखला.

मुंबई  - वरळी डेअर येथून पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी सुरु झालेल्या अर्ध मॅरेथॉनला धावपटूंचा तुफान प्रतिसाद मिळाला. थंड वातावरणामध्ये सुरु झालेल्या या शर्यतीमध्ये अव्वल धावपटूंनी अपेक्षित वर्चस्व राखले. महिला गटामध्ये संजीवनी जाधव आणि मोनिका आथरे या नाशिककरांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पटकावताना आपला दबदबा राखला. रेल्वेच्या जुमा खातून हिने कांस्य पदकावर नाव कोरले. त्याचवेळी, पुरुष गटात प्रदीप सिंग आणि शंकरमान थापा या सेनादलाच्या धावपटूंनी पहिल्या दोन क्रमांकावर कब्जा मिळवला, तर कोल्हापूरच्या दीपक कुंभार याने कांस्य पदकावर नाव कोरले. महिला गटामध्ये जेतेपदासाठी संजीवनी आणि मोनिका यांच्यामध्ये कडवी चुरस रंगली. दोघीही १० किमी अंतरापर्यंत एकत्रित होत्या. जुमा, किरण आणि जनाबाई हिरवे यांनीही या दोघींना कडवी टक्कर देताना शर्यतीमध्ये रंगत आणली. मात्र, २० किमीनंतर संजीवनीने घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना १ तास २६ मिनिटे २४ सेकंदाची विजयी वेळ नोंदवली. त्याचवेळी, मोनिकाने (१:२७:१५) दुसरे स्थान निसटणार नसल्याची खबरदारी घेत रौप्य पटकवाले, तर जुमाने (१:२७:४८) कांस्य पदकावर नाव कोरले. पुरुष गटामध्ये मात्र सेनादलाच्या धावपटूंनी अपेक्षित वर्चस्व राखले. प्रदीप सिंग आणि शंकरमान थापा या सेनादलाच्या धावपटूंना चांगली टक्कर दिलेल्या कोल्हापूरच्या दीपक कुंभारने कांस्य पदक पटकावण्यात यश मिळवले. सुवर्ण पदकाची चुरस प्रदीप आणि शंकरमान यांच्यामध्येच रंगली. तरी कुंभारने या दोघांपुढे आव्हान निर्माण केले. पहिले १० किमी अंतर कुंभारने अनपेक्षितपणे आघाडी राखली. यावेळी तो अनपेक्षित निकाल लावणार असेच चित्र होते. मात्र, शंकरमानने नंतर आघाडी घेतली आणि त्यानंतर मोक्याच्यावेळी वेग वाढवताना प्रदीपने तिसºया क्रमांकावरुन थेट आघाडी मिळवत अखेरपर्यंत आपले स्थान कायम राखले. तसेच, कुंभारला वेगामध्ये सातत्य कायम राखण्यात अपयश आल्याने अखेर कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. प्रदीपने १ तास ५ मिनिटे ४२ सेकंदाची विजयी वेळ नोंदवली. शंकरमानने १ तास ६ मिनिटे ४० सेकंद आणि कुंभारने १ तास ६ मिनिटे ५४ सेकंदाची वेळ नोंदवत पोडियम स्थान पटकावले.

टॅग्स :Mumbai Marathonमुंबई मॅरेथॉनMumbai Marathon 2018मुंबई मॅरेथॉन २०१८MumbaiमुंबईSportsक्रीडा