भारताच्या हिमा दासने रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 07:19 IST2018-07-12T23:16:42+5:302018-07-13T07:19:30+5:30
जागतिक स्पर्धेच्या 400 मी धावण्याच्या अंतिम फेरीत हिमाने नेत्रदीपक कामगिरी केली. या अंतिम फेरीत हिमाने 400 मी. अंतर 51.46 सेकंदांमध्ये हे अंतर पार करत अव्वल क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.

भारताच्या हिमा दासने रचला इतिहास
नवी दिल्ली : भारताच्या हिमा दासने अॅथलेटीक्स स्पर्धेत इतिहास रचला आहे. जागतिक अॅथएलेटीक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत हिमाने सुवर्णपदक पटकावले आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी हिमा ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
या स्पर्धेच्या 400 मी धावण्याच्या अंतिम फेरीत हिमाने नेत्रदीपक कामगिरी केली. या अंतिम फेरीत हिमाने 400 मी. अंतर 51.46 सेकंदांमध्ये हे अंतर पार करत अव्वल क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत रोमानियाच्या आंद्रेआ मिकलोसने हे अंतर 52.07 सेकंदांमध्ये पूर्ण केले. या स्पर्धेत तिसरा क्रमांक अमेरिकेच्या टेलर मानसॉनने पटकावला, तिने हे अंतर 52.28 सेकंदांमध्ये पूर्ण केले.
#relive the historic #race of Hima Das who became first Indian athlete to win track event (400m in 51.46s) Gold medal in the IAAF World Junior Athletics Championship @afiindiapic.twitter.com/CB0TzS9y5W
— Rahul PAWAR (@rahuldpawar) July 12, 2018